14.3 C
New York
Sunday, March 22, 2026

Buy now

spot_img

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शहरटाकळी विद्यालयाची शर्वरी म्हस्के प्रथम

 

*[ अविनाश देशमुख शेवगाव ] शेवगाव प्रतिनिधी

दिनांक 10 जानेवारी 2026 वार शनिवार ~
या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगाव तालुक्यातील एफडीएल संस्थेचे शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.6 वी ते इ. 8 वी विज्ञान गटातून कु. म्हस्के शर्वरी रामनाथ हिच्या *पर्यावरण पूरक कुंड्या* या उपकरणास जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

जिल्हास्तरावर जामखेड येथे आयोजित या प्रदर्शनामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शर्वरीचा पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.त्यावेळी सोबत शिक्षिका सोनाली सुसे होत्या.
या गुणवंत विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा .ॲड.डॉ. विद्याधरजी काकडे साहेब, विश्वस्त सौ हर्षदाताई काकडे मा.जि. प.सदस्या, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ.लक्ष्मणराव बिटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंहभैया काकडे, शैक्षणिक विभाग प्रमुख वंदना पुजारी, शैक्षणिक विभाग सहप्रमुख अशोकराव आहेर, विद्यालयाचे प्राचार्य कांतेश्वर ढोले, पर्यवेक्षक सुनील जायभाये, यांनी शर्वरीचे अभिनंदन व कौतुक केले. या गुणवंत विद्यार्थिनीला गणित विज्ञान शिक्षक आदिनाथ काटे, शशिकांत काकडे,अमोल गाडगे, रीना हांडे यांचे मार्गदर्शन लाभले .

 

Related Articles

ताज्या बातम्या