1.2 C
New York
Tuesday, February 3, 2026

Buy now

spot_img

आर्ले पाटील पतसंस्थेकडून पत्रकारांची नेत्र तपासणी*

*सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे कुकाण्याचे डॉ.आर्ले दांपत्य

नेवासा(तालुका प्रतिनिधी):– नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील आर्ले पाटील अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त भेंडा-कुकाणा परिसरातील पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी व उपचार करण्यात आले.

गुरुवार दिनांक ०८ रोजी दुपारी ४ वाजता डॉ.आर्ले हॉस्पिटल येथे
सुलोचन आय केअरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.रामचंद्र काळे यांनी सुखदेव फुलारी,अनिल गर्जे, बाळकृष्ण पुरोहित,कारभारी गरड,नामदेव शिंदे,सुनील पंडित, सोपान भगत, प्रा.संतोष सोनवणे, सोमनाथ कचरे,संतोष औताडे या पत्रकारांची नेत्र तपासणी केली. त्यांना नेत्र चिकित्सक अजय झिरपे यांनी मदत केली.
आर्ले पाटील पतसंस्थे कडून मोफत औषधे देण्यात आली.

पतसंस्थेचे संस्थापक डॉ. गणेश आर्ले,अध्यक्षा सौ.मीना आर्ले यांनी पत्रकारांचा गणेश प्रतिमा, शाल,दिनदर्शिका देवून सन्मान केला.
संस्थेचे व्यवस्थापक नितीन मेहेत्रे, कृष्णा कोलते, तेजस गव्हाणे, मनोज चोखर आदि यावेळी उपस्थित होते.
केवळ
मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व समाजातील लोकांना अल्प दरात वैद्यकीय सेवा देणारे, प्रसंगी देखील स्वखर्चाने औषधोपचार करून देणारे डॉ.आर्ले दांपत्य यांच्या कार्याचे पत्रकार बांधवांकडून स्वागत
करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या