14.3 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

spot_img

शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संकुल ढोरजळगाव ने येथे महंत ह.भ.प.श्री.आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड यांची संकुलास सदिच्छा भेट.*

 

दै.नगरशाही ढोरजळगाव प्रतिनिधी – शिक्षण महर्षी साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संकुल ढोरजळगाव येथे आज तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत.आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संकुलाचे मुख्य प्रशासक श्री.सचिन कर्डिले सर,त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य .संजय बुधवंत , माध्यमिक विभागाचे प्राचार्य आशिष भारती , विकास अधिकारी आनंदभाऊ घाडगे पाटील, विष्णुपंत बडे काका,सोमनाथ पाटील बडे,राजू पाटील बडे, डॉ.देविदास देशमुख, .प्रदीप नवल ,मुख्याध्यापिका श्रीमती संगीता झिंजुर्डे तसेच संकुलातील कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये महाराजांचे संतपूजन करण्यात आले.

ह.भ.प.आदिनाथ शास्त्री महाराजांनी आपल्या सुमधुर वाणीतून संकुलाचा झालेला विकास व प्रगती याविषयी समाधान व्यक्त केले, संपूर्ण संकुल प्रत्यक्ष फिरून पहिले, शुभेच्छा दिल्या …त्याचबरोबर आद.घाडगे साहेबांच्या कार्याचा लेखाजोखा सर्वांसमोर संबोधित केला. व आद.साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार अशोक गाडे सर यांनी केले..

Related Articles

ताज्या बातम्या