नेवासा प्रतिनिधी: समीर शेख
अहिल्यानगर येथील नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील कै.संत हरीभाऊ आनंदराव घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी व बारावीचा २८डिसेंबर २०२६रोजी पालक शिक्षक सुसंवाद मेळावा उत्साहात पार पडला.
या पालक मेळाव्यास अध्यक्ष म्हणून श्रीकांत पौळ, तसेच कुकाणा केंद्राच्या केंद्राच्या केंद्रप्रमुख कमल लाटे मॅडम,अरुणपाटील घाडगे,सतिषराव काळे, काकासाहेब काळे,चंद्रकांत पाडळे,कानिफनाथ घोडेचोर,ज्ञानेश्वर राऊत,काकासाहेब काळे,अमोल महाराज घाडगे,संजय साळवे,संदिप काळे,महिला पालक प्रतिनिधी निर्मला राऊत,प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक मधुकर घाडगे, विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे, विभागप्रमुख प्रविण गोर्डे व अतुल कराड आदि मान्यवर उपस्थित होते.पालक मेळाव्यात पालकांनी आपल्या पाल्याच्या व शाळेच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक शरद कराड यांनी केले.याप्रसंगी प्राध्यापक मधुकर घाडगे,सतिष काळे,प्राध्यापक प्रमोद घोडेचोर,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे तसेच प्रशासक मनिषा राऊत,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत पौळ आदि वक्त्यांनी आपल्या मनोगतातून..बदलत्या परीक्षा पद्धती,अभ्यास पद्धती,’घरचे केंद्र-घरचे शिक्षक’ ही बदलेली संकल्पना,दहावी चे जीवनातील महत्व, मोबाईल चे फायदे तोटे,विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,आदी मुद्यांवर सांगोपांग चर्चा करत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.याप्रसंगी इयत्ता दहावी च्या सिद्धी काळे व तनुश्री परभणे या विद्यार्थीनींनी ही मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी पालक संजय साळवे व सतिष काळे यांनी विद्यालयातील बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक बक्षिसांचीही घोषणाही केली.
प्रमुख अतिथी व पालक प्रतिनिधी म्हणून मार्गदर्शन करताना प्राध्यापक मधुकर घाडगे,सतिषराव काळे,अमोल महाराज, श्रीकांत पौळ,प्राचार्य व प्रशासक व शिक्षक आदींनी आपल्या मनोगतात सांगितले की..,शाळा ह्या संस्कार-केंद्र आहेत शाळेत विद्यार्थ्यांवर संस्कार होतात पण प्रत्येक पालकाने ही आपल्या घरी सुसंस्काराचे रोपटे.. लावले पाहिजे..म्हणजे शिक्षेचा प्रश्न उद्भवणार नाही..शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे होत असून त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होण्यासाठी शिक्षक-पालक सुसंवादाचा हा छोटासा प्रयत्न..उल्लेखनीय आहे..त्यामुळे घाडगे पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या टीमचे अभिनंदन याचे श्रेय स्व.घाडगेसाहेबांचे असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी शिक्षकांशी संवाद साधून आपल्या पाल्याच्या प्रगती विषयी माहिती घेतली. बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून जास्तीत-जास्त अभ्यास करवून घेऊन गुणवत्ता कशी वाढेल यासाठी घरीसुद्धा नियोजन करून अभ्यासास पूरक गोष्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकांनी दिले. तसेच मोबाईल आणि टीव्ही यावर परीक्षा होईपर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखवली.
कार्यक्रमाचे संचालन इयत्ता दहावी च्या विद्यार्थीनी कार्तिकी घोडेचोर, भाग्यश्री काळे,तनुश्री परभणे यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रमोद घोडेचोर यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.










