1.2 C
New York
Tuesday, February 3, 2026

Buy now

spot_img

शरणपूर वृद्धाश्रम आजी आजोबा यांना युवा सेना आणि शुभम उगले मित्रमंडळ वतीने ब्लेंकेट वाटप* *

.नगरशाही बेलपिंपळगाव  प्रतिनिधी/गणेश चौघुले राष्ट्रीय युवा सेना कार्य अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेवासा* *तालुक्यातील फत्तेपूर येथील वृदद्धाश्रम मध्ये मिठाई आणि ब्लॅंकेट वाटप युवा सेनेचे* *शिवसैनिक शुभम उगले* अभिष्टचिंतन सोहळा साजरा करतांना आतिशबाजी करण्यापेक्षा अनाथ आश्रम आणि वृद्धांना सढळ हाताने मदत करा. समाजाचे आपण देणे लागतो ज्या समाजात आपण राहतो तो आपणाला घडवण्यासाठी अनाहुत पणे मदत करत असतो. मनुष्य हा समाज शील प्राणी आहे. समाजाशिवाय तो राहू शकत नाही. देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे युवा नेते शुभम उगले यांचा आदर्श समाजाने घ्यावा असे धर्मरक्षक गणेश चौगुले सर यांनी सांगितले. घरात आई आणि दारात गाई असावी.. गोमातेसाठी हिरवा चारा आणि आई साठी अन्न, वस्र, निवारा आदी व्यवस्था समाजातील दानशूर व्यक्तींनी करावी असे आव्हान शुभम उगले यांनी केले. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील वृद्धाश्रम मध्ये सुमारे बावीस आजी आणि आठ आजोबा आहेत. त्यांना अन्न, औषध, कपडे, किराणा आदी मदत करावी असे आव्हान टोक्याचे सरपंच राहुल लकारे यांनी केले. आश्रम करिता सरंकशक भीत अथवा तार कंपाउंड, वृद्ध व्यक्तींचे ‘डोल साठी आधार कार्ड उघडणे कामी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी साहेब, शिवसेना आणि समाजातील विविध घटकंतील लोकांनी करावी असे संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले. या वेळी युवा नेते शुभम उगले, धर्मरक्षक गणेश चौगुले, सरपंच राहुल लकारे, चांगदेव नरवडे, अशोकराव वाघचौरे आजी आजोबा आदी मोठ्या संख्येने उपस्तितीत होते.

Related Articles

ताज्या बातम्या