महाक्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन*
दै.नगरशाही ढोरजळगाव प्रतिनिधी –
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुल, ढोरजळगाव ने येथील शिक्षणमहर्षी आद. साहेबरावजी घाडगेपाटील साहेब क्रीडानगरी येथे संस्थेचे मानद विश्वस्त सन्माननीय श्री.चेतनजी चव्हाणपाटील यांचे संकल्पनेतून त्रिमूर्तीच्या सर्व शाखेतील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था अंतर्गत त्रिमूर्तीच्या पूर्णतः मेस व वसतीगृहयुक्त सैनिकी पद्धतीच्या निवासी शाखेचे यजमान ढोरजळगाव -ने संकुलासह त्रिमूर्तीनगर नेवासाफाटा, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल तेलकुडगाव, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल घोगरगाव या शाखेतील 3000 हजार पेक्षा जास्त खेळाडूसाठी भव्य त्रिमूर्ती महाक्रीडा स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा त्रिमूर्ती परीवाराच्या मातोश्री आदरणीय ॲड. सुमतीताई साहेबरावजी घाडगेपाटील या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सहाय्यक गटविकास अधिकारी मा.सुरेशराव पाटेकर साहेब,भाजपा ज्येष्ठ नेते मा. बापूसाहेब पाटेकर पाटील,संस्थेचे मानद विश्वस्त श्री.चेतनजी चव्हाण पाटील, सहसचिव डॉ.श्रुतीदीदी आमलेपाटील- घाडगेपाटील, ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी मा. लक्ष्मणराव नाकाडे पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती मा. देविदास पाटेकर, मार्केट कमिटीचे उपसभापती मा. डॉ.श्री. सुधाकर लांडे पाटील, मा. श्री.राजेंद्र देशमुख, आदर्शगाव वाघोलीचे सरपंच मा.श्री.उमेशजी भालसिंग,मा.सरपंच श्री. एकनाथराव कराड पाटील, मा. सरपंच श्री.सुखदेव भाऊ कराड पाटील, डॉ. विश्वासराव जायभाये, भाजपा युवा नेते मा. श्री.गणेशराव कराड पाटील, मा.श्री.अनंता उकिर्डे पाटील, तेलकुडगावचे सरपंच मा. श्री.सतीषराव काळे पाटील, मा. सुखदेव उकिर्डे पाटील, मा .पोलिस पाटील श्री. लक्ष्मणराव डोळस पाटील,माजी प्राचार्य विक्रमराव उकिर्डे सर, मा. चंद्रभान गाडगे सर,श्री. भाऊसाहेब चेके साहेब, निंबे नांदूरचे चेअरमन मा. श्री.संदीपराव बडे पाटील, श्री. शहादेव खोसे पाटील, श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री संजय चेमटे सर, श्री. अल्हाट सर, डॉ. देविदास देशमुख, डॉ. प्रशांत बुधवंत,संकुल विकास अधिकारी श्री. आनंदराव घाडगेपाटील,त्रिमूर्ती सीनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. डॉ. सुनील चोळके सर, श्री.लक्ष्मणराव नाकाडे पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री.विनोद भोईटे सर, तेलकुडगाव संकुलाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब दुधाडे सर, समन्वयक श्री. नामदेव ताके सर, शेवगाव संकुलाचे प्राचार्य श्री. शिवाजीराव काटे सर घोगरगाव संकुलाचे प्राचार्य श्री. संतोष जावळे सर, वै. ठकुबाई हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. आशिष भारती सर, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल प्राचार्य श्री. संजय बुधवंत सर मुख्याध्यापिका श्रीमती. संगीता झिंजुर्डे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व मान्यवरांचे संकुलाच्या वतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. पुढे अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. बँड पथकाच्या साह्याने वाजत गाजत पथसंचलन करत क्रिकेट,कबड्डी,व्हॉलिबॉल, खो खो,कुस्ती,बॅडमिंटन, बास्केट बॉल,ॲथलेटिक्स रस्सीखेच या सर्वप्रकारच्या मैदानाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले..त्यानंतर सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले.सर्व मान्यवरांना त्रिमूर्तीनगर मधील टी.एम.एस., टी.पी. एस. व त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूल तसेच तेलकुडगाव संकुल, शेवगाव संकुल, घोगरगाव संकुल व यजमान ढोरजळगाव संकुलातील महाक्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून हवेत बलून व कबूतर सोडून भव्य उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाची मानद विश्वस्त तथा मुख्य प्रशासक श्री. सचिनराव कर्डिले सर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते गणेशराव कराड, संस्थेचे मानद विश्वस्त व या त्रिमूर्ती महाक्रीडा स्पर्धेचे प्रणेते श्री. चेतनजी चव्हाण पाटील, मा. गटविकास अधिकारी श्री. सुरेशराव पाटेकर साहेब, ज्येष्ठ नेते श्री बापूसाहेब पाटेकर पाटील यांनी मनोगते व्यक्त करत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. शेवटी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या अध्यक्षा ॲड .सुमतीताई घाडगेपाटील यांनी संकुला विषयी गौरवउद्गार काढत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.श्री.अशोक गाडे सर यांनी केले तर सर्व उपस्थित यांचे आभार शेवगाव संकुलाचे मानद विश्वस्त श्री.बाळासाहेब कोकरे सर यांनी मानले. या भव्य कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर, त्रिमुर्तीचे सर्व क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक, सैनिकी प्रशिक्षक, खेळाडू, बाल सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल ढोरजळगाव येथील सर्व स्टाफ व स्वयंसेवकांनी विशेष परीश्रम घेतले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.










