दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी –
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित, ‘जिजामाता पब्लिक स्कूल ‘मध्ये राजे यशवंतराव होळकर मोफत निवासी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण योजनेअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे प्रा. सुयोग घोरपडे, प्रा.डॉ. राजेंद्र गवळी, प्रा. दीपक राऊत व बापुसाहेब टेकणे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य चे वाटप करण्यात आले.एन.टी.सी म्हणजेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे . यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रविण कोकरे यांनी केले.










