जायगुडे वस्ती शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत !
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी/ मो.समी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायगुडे वस्ती येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मधून भव्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावर्षीच्या नवीन शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेमध्ये गणवेश ,बूट ,पुष्पगुच्छ ,पाठ्यपुस्तके देऊन भव्य स्वागत करण्यात आले.
इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची बिस्किट, फुगे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . फुलांच्या माळांनी व फुग्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची गावामधून वाजत गाजत भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले व आपल्या पाल्यांचे कौतुक पाहत होते. मिरवणुकीनंतर शाळेमध्ये उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पालक व सर्व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी सर्व पाठ्यपुस्तके, गणवेश, खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दुपारच्या मध्यान्ह भोजन मध्ये विद्यार्थ्यांना जिलेबीचे जेवण देण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य प्रतिष्ठित नागरिक पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बेहळे सर यांनी केले. प्रास्ताविक व शासनाच्या विविध योजना तसेच शाळेच्या अडचणी याबाबत मुख्याध्यापक श्री बाळासाहेब शिंदे सर यांनी आपले मत व्यक्त केले. तर आभार जेष्ठ पदवीधर शिक्षक श्री करवंदे सर यांनी केले.
यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब शिंदे सर, निखिल पवार सर, सूर्यकांत गट सर, अंजली खिल्लारी मॅडम, विठ्ठल कांगणे सर युवा प्रशिक्षणार्थी चव्हाण मॅडम आधी आदी सर्व शिक्षक उपस्थित होते.