तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयाची निकाल परंपरा कायम
प्रतिनिधी:समीर शेख
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत- पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक,लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी)परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या.माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.10वी)परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धती नुसार नुकताच जाहीर झाला.त्यामध्ये अ.नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील कै.संत हरिभाऊ आनंदराव घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93.20 टक्के लागला.यामध्ये कु.काळे श्रावणी गोवर्धन 91.40 टक्के गुणासह प्रथम क्रमांक पटकावला तर कु.साळुंके आदिती रावसाहेब हिने 91.20 टक्के गुणासह द्वितीय क्रमांक पटकावला, तृतीय क्रमांक कु.लांडगे वैष्णवी सुहास 88%, चतुर्थ क्रमांक चि.भोजने ईश्वर तुकाराम 85.60%,पाचवा क्रमांक चि.काळे रुद्राक्ष बाळासाहेब 82.60% व कु.शेटे संचिता सतीश हिने 82% गुणासह विद्यालयात सहावा क्रमांक पटकावला.
सदर इयत्ता-दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयातील एकूण 146 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी विशेष प्राविण्यासह 10 विद्यार्थी तर 33 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील,अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील,उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण-घाडगे पाटील,सचिव मनीष घाडगे पाटील,प्रशासक मनीषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
सदर विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख अतुल कराड,केंद्रसंचालक बाळासाहेब काळे, समीर शेख,नवनाथ उकिर्डे,किरण पाठक, अविनाश घोडेचोर,रेखा राणे,सुनंदा सुकासे,रेणूका काळे,चाबुकस्वार मॅडम,
बंडू पैठणपगार आदिंचे मार्गदर्शन लाभले.