8.4 C
New York
Sunday, March 22, 2026

Buy now

spot_img

नेवासा होमगार्डचे कार्य कौतुकास्पद- डॉ करणसिंह घुले.

नेवासा होमगार्ड कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

(नेवासा प्रतिनिधी):- ०२
नेवासा येथील होमगार्ड कार्यालया च्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समर्पण फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ करणसिंह घुले यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली कायदा व सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी नेवासा होमगार्डचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार डॉ करणसिंह घुले यांनी काढले.

या प्रसंगी काश्मीर येथील पहलगाम घटने बद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली प्रारंभी होमगार्ड कार्यालयाच्या वतीने पलटन नायक अशोकराव टेमकर
यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले तर उपस्थित मान्यवरांचा ,पोलिस पाटिल दिलीप गायकवाड, पलटन नायक श्रीकांत ससे, दादासाहेब कनगरे, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी होमगार्डचे प्रसिद्धि प्रमुख सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर माजी समादेशक अधिकारी राजेंद्र बोरुडे यांनी संचलन करून मानवंदना दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर गारुळे,अशोकराव डहाळे,अंशकालीन लिपिक अल्ताफ़ शेख, गणेश लोहकरे,गफ्फार शेख,अरुण देवढे, महिला होमगार्ड रुख्मिनी सरोदे,मनीषा खादे, सुनंदा कवडे रंजना रासकर,आदि उपस्थित होते.

नेवासा होमगार्ड पथकातील जवानासाठी लवकरच विमा सरक्षंण बद्दल पाठपुरवा करुन देऊ अशी ग्वाही डॉ घुले यांनी यावेळी बोलतांना दिली.
तर मोहन गायकवाड यांनी उपस्थित होमगार्ड व मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या