14.3 C
New York
Sunday, March 22, 2026

Buy now

spot_img

शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी श्रीकांत भागवत यांची नियुक्ती.

शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी श्रीकांत भागवत यांची नियुक्ती.

नेवासे शहर ता.२९
शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी व्ही, जे,एन, टी, सेनेच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी नेवासे तालुक्यातील भालगावं येथील युवा नेते श्रीकांत कचरू भागवत यांची नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,यांच्या आशिर्वादाने व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार,तसेच शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना शिंदे गट ओबीसी व्ही, जे,एन, टी, सेना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते भागवत यांना मुंबई येथील पक्ष कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी मोठ्या संख्यने शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक व उपस्थित होते.

संभाजीनगर येथील जिल्हाध्यक्ष दत्तात्रय म्हैत्रे यांनी आपल्यावर विश्वास दाखवून पक्षाकडे शिफारस केली त्यामुळेच मला मोठी जवाबदारी मिळाल्याचे भागवत यांनी यावेळी संगितले तसेच यापुढे या पदाच्या मध्यमातुम लोकहिताचे कामे करू व शासन दरबारी गोरगरीब जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावू असे भागवत यांनी सांगितले.

भागवत यांच्या नियुक्ति बद्दल नेवासे तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोट–
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोट- माझ्या सारख्या सामान्य तरुणांवर शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मोठी जबाबदारी दिल्याने नक्कीच या मध्यमातुम युवकांचे मोठी फळी उभा करून आहिल्यानगर जिल्ह्यात ओबीसी व्ही, जे,एन, टी ची एक मोठी ताकत निर्माण करणार.
श्रीकांत भागवत
ओबीसी जिल्हाध्यक्ष.

Related Articles

ताज्या बातम्या