26.5 C
New York
Saturday, June 7, 2025

Buy now

spot_img

शिष्यवृत्ती परीक्षेत तेलकूडगावच्या घाडगे पाटील विद्यालयाचे यश

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी /समीर शेख

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत आयोजित उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेमध्ये नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील कै.संत हरीभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सदर परीक्षेत कुणाल दीपक घाडगे, समृद्धी भाऊसाहेब घोडेचोर,देवयानी रामचंद्र काळे,ईश्वरी सचिन काळे हे चार विद्यार्थी पात्र झाले आणि विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा अबाधित ठेवली त्याबद्दल गुणवंत विद्यार्थी आणि पालक यांचा सन्मान-सोहळा नूकताच विद्यालयात पार पडला.तेलकूडगाव मधील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या प्रशासक मनिषा राऊत आणि प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सन्मान करण्यात आला.

वरील गुणवंत विद्यार्थ्यांना कालिदास बडे,गणेश मुंगसे,गणेश काळे,सुवर्णा काळे,आदिंनी मार्गदर्शन केले होते.
याप्रसंगी जेष्ठ शिक्षक भाऊ घाडगे, प्रमोद घोडेचोर,अतुल कराड,प्रविण गोर्डे, किरण पाठक,समीर शेख,सचिन काळे, भाऊसाहेब घोडेचोर,दिपक घाडगे,रामचंद्र काळे,रामदास कनगरे,नानासाहेब बांदल, अभिजीत दाभाडकरअविनाश घोडेचोर,महेश घाडगे,योगेश घाडगे,रेणूका काळे,सुनंदा सुकासे आदी उपस्थित होते.यावेळी पालकांच्या वतीने बोलताना दिपक घाडगे यांनी आपल्या मनोगतून विद्यालयाच्या कामगिरी विषयी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास बडे यांनी केले तर आभार बाळासाहेब काळे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या