20.9 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

रांजणगाव देवी येथेअखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ…विद्यार्थ्यांना संस्कृती ची माहिती मिळते : बाळासाहेब पंडित

रांजणगाव देवी येथेअखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ….नगरशाही भेंडा प्रतिनिधी : मौजे रांजणगाव येथील
प्राचीन काळापासून वै. ह भ प बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहपूर्वक साजरा होत आहे. याप्रसंगीवै ह भ प बन्सीमहाराज तांबे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब पंडित सर यांनी गावातील पूर्व इतिहास व या सप्ताहाची अखंड परंपरा कशी आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले.तसेच अशा सप्ताहात विद्यार्थ्यांना संस्कृती ची माहिती होते, शाळेतील अनेक विद्यार्थी या पारायण अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सहभागी झालेले आहेत .तसेच विद्यालयाचे शिक्षक श्री विठ्ठल होले सर यांनी सिद्धेश्वर भजनी मंडळ रांजणगाव देवी यांना ज्ञानेश्वरी ग्रंथा ची पारायण 11 प्रति मंडळास स्नेह भेट दिल्यात त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने होले सर यांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे शासनाचे अभिनंदन केलेआहे.

मराठी भाषेचे महत्त्व समजून सांगताना ज्ञानेश्वरीतील काही दाखले देऊ सरांनी विद्यार्थ्याला व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. गावामध्ये अतिशय उत्साह पूर्वक पांगतीमध्ये अन्नदान देणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत व अभिनंदन केले. या ठिकाणी सायंकाळी पांगतीचे नियोजन केले जाते .संपूर्ण गावाला त्यांच्या वतीने अन्नदान केले जाते. त्यांचे खूप खूप आभार मानले .याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री सरोदे सर आरेकर सर ,होले सर इतर शिक्षक व इतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील जेष्ठ मंडळी माजी सरपंच शिवाजी पाटील वाकचौरे ,कारभारी पेहेरे, चेअरमन व अध्यात्मप्रेमी,विशेष करून गावातील सर्व तरुण मंडळ यांचे योगदान आहे. सिद्धेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांना विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

ताज्या बातम्या