*शिवजयंती च्या मुहूर्तावर श्रीमंत छत्रपती प्रतिष्ठान ची स्थापना*
सोनई / शिंगणापूर– सोनई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती निमित्त महाराजांचा अभिषेक करून आरती करण्यात आली, त्यावेळी जि.प.सदस्य सुनीलभाऊ गडाख पा, अप्पा निमसे,सरपंच दादु वैरागर,उपस्थित होते, त्यावेळी श्रीमंत छत्रपती प्रतिष्ठान ची स्थापनेची घोषणा करण्यात आली, प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी विनायक येळवंडे,उपाध्यक्षपदी संतोष जगताप, खजिनदार मिलिंद बोगाने यांची निवडीची माहिती सचिव सनी कुरकुटे यांनी दिली.
, त्यावेळी सदस्य विकास लाटे,महेश पोंढे, रोहित कुऱ्हे, राहुल पवार,विकास बोरकर, सचिन गर्जे,अक्षय डफाळ,प्रदीप घावटे, महावीर चोपडा, अक्षय लुनिया,गोपल बालदी,प्रमोद कुमावत,सागर सोनवणे,गणेश साळवे,सचिन धनगर, सागर घोरपडे, आदीं उपस्थित होते.आभार राहुल पवार यांनी मानले.