नेवासा तालुक्यातील सेवेकरी *जागतिक कृषी महोत्सव 2025 व भैरव चंडी* करिता अब्दुल भैय्या
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
नाशिक येथे सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सव व मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट त्रंबकेश्वर या ठिकाणी भैरव चंडी या कार्यक्रमाकरिता नेवासा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील८८ सेवेकरी गेले होते. त्याकरिता सामाजिक कार्यकर्ते अब्दुल भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांनी बसचे नियोजन केले होते.
याचा सर्व शेतकऱ्यांनी आनंद घेतला त्याबद्दल सर्व सेविकाऱ्यांना अब्दुल भाईंना धन्यवाद दिले तसेच या जागतिक कृषी महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सेंद्रिय शेती चे स्टॉल तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची विवाह, स्वयंरोजगार विभागातून पाच हजार युवकांना नोकरीची संधी भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने केली जाणारे 18 विभागातील काम आदर्श गावाची रचना अशी असावी असे विविध गोष्टींचे प्रदर्शन या जागतिक महोत्सवांमध्ये बघण्यास मिळाले.
तसेच विविध विषयांवर परिसंवाद आयोजित केले होते अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याचा योग सामाजिक कार्यकर्ते अब्दुल भाई शेख यांच्यामुळे आला त्यामुळे तालुक्यातील सर्व सेविकाऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले व त्यांच्याकडून अशी सेवा घडो अशी स्वामी चरणी प्रार्थना केली.










