दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी : आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील सामाजिक कार्यकर्ते अहेले सुन्नतचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रा.रज्जाकशहा इनामदार यांची सांत्वनपर भेट घेतली.
प्रा.रज्जाकशहा यांच्या मातोश्री इन्ताजबी निजामशहा इनामदार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.यावेळी युवा नेते डॉ. महेश देशमुख, शंकर भारस्कर, जितेंद्र देशमुख, पत्रकार बाळासाहेब सरोदे,दत्तात्रय देवढे, संजय पवार,रमेश पुंड ,विजय पवार,सलिम इनामदार,जब्बार इनामदार, मोसिम इनामदार,यांच्या सह मित्र परिवार उपस्थित होता.