29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

* *युवा नेते मा.सभापती डॉ.श्री. क्षितिज भैय्या घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली केंद्र जि.प.शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

  • दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी :**शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज भैय्या नरेंद्रजी घुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन घुले पाटील मित्र मंडळाच्या वतीने शाळेतील मुलांना* *शालेय पोषण आहारासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले.
    *सण-उत्सव, वाढदिवस साजरे करत असताना प्रत्येकाने आपल्या समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासावी. शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे होत असतात, त्याच प्रमाणे यावर्षी देखील वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली याठिकाणी वाढदिवस साजरा करून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या असल्याचे जेष्ठ नेते भरतराव वाढेकर व दिनू तात्या फुंदे यांनी सांगितले* .

*यावेळी जेष्ठ नेते बबेराव भालसींग पा, दिलीप भालसींग, प्रकाश वांढेकर,माणीकबापू भालसींग गणेश सर भालसींग, पांडुरंग दातीर, महेश दातीर, अशोकराव जमधडे, भैय्यासाहेब भालसींग, मोरे भाऊसाहेब, महेश कळकुटे, डॉ भगवान वांढेकर, महेश आहेर सर, प्रमिला गोरे मॅडम, आदी घुले पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते*

Related Articles

ताज्या बातम्या