*कुकाणा प्रतिनिधी: समीर शेख*
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील (आबा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त येत्या रविवारी, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा पुण्यस्मरण सोहळा नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील ‘त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल’ या ठिकाणी पार पडणार आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमतीताई साहेबराव घाडगेपाटील आणि घाडगेपाटील परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
*ह.भ.प. समाधानजी महाराज शर्मा यांचे कीर्तन*
या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून विशेष *’कीर्तन सेवा’आयोजित करण्यात आली आहे. केज येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार **ह.भ.प. वाणीभूषण समाधानजी महाराज शर्मा** हे सकाळी ९ ते ११ या वेळेत आपले सुश्राव्य कीर्तन सादर करणार आहेत.
घाडगेपाटील यांच्या प्रेमळ, स्नेही आणि माणुसकीच्या स्वभावाची आठवण म्हणून आयोजित केलेल्या या सोहळ्यास सर्व नागरिकांनी, हितचिंतकांनी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व घाडगेपाटील परिवाराकडून करण्यात आले आहे.










