20.3 C
New York
Tuesday, June 23, 2026

Buy now

spot_img

भेंडा ग्रामपंचायत वतीने एकल महिलांचा विमा व बचत गटांना पारितोषिके

भेंडा – दै.नगरशाही वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भेंडा बुद्रुक मधील सर्व एकल महिलांचा विमा उतरवणे व एकल महिला बचत गटापैकी उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या गटांना तीन पारितोषिके देणार असल्याची घोषणा सरपंच सुहासिनी किशोर मिसाळ यांनी केली.


महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षानिमित्त भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये महिला बालविकास विभाग,पंचायत समिती नेवासा , साऊ एकल महिला समिती व भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सरपंच तथा प्रशासक सुहासिनी मिसाळ यांनी वरील प्रमाणे घोषणा केली. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमास साऊ एकल महिला समितीचे जिल्हा समन्वयक कारभारी गरड,सेंट्रल बँक आर्थिक साक्षरता केंद्र अधिकारी रवींद्र काळे, पोस्ट कार्यलय अधिकारी प्रशांत कराड, बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा नजन, उमेद बचत गटाचे अर्जुन सोनवणे,मीना कदम, ग्राम विकास अधिकारी रेवन्नाथ भिसे,बाबासाहेब गोर्डे, विष्णू फुलारी आदींची उपस्थिती होती.
एकल महिला बचत गटांमार्फत झालेली महिला सक्षमीकरणाची तसेच सामाजिक जाणीवेतून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भेंडा बुद्रुक मधील बचत गटांना प्रथम 5 हजार,द्वितीय 3 हजार व तृतीय 2 हजार रुपयाचे पारितोषिक देणार असल्याचे सरपंच तथा प्रशासक सुहासिनी मिसाळ यांनी जाहीर केले. याप्रसंगी महात्मा फुले यांनी एकल महिला बाबत केलेल्या जीवन कार्याविषयी अंगणवाडी सेविका सुनीता कदम, बचत गतासाठी बँकेमार्फत असणारी कर्ज योजना, लागणारी कागदपत्र, प्रस्ताव सादर करण्याची पद्धत आदिबाबत रवींद्र काळे, पोस्ट ऑफिसच्या योजना ,अपघात विमा सुविधा बाबत प्रसाद कराड ,बचत गट स्थापना, कर्ज योजना, परतफेड, गटाचे साहित्य विक्री बाबत अर्जुन सोनवणे, मीना कदम यांनी माहिती दिली. राज्य शासन तयार करत असलेल्या एकल महिला धोरणासाठी करावयाच्या विविध सूचना व अभिप्राय, साऊ एकल महिला समितीचे हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर चालू असलेले कार्य, शासन प्रशासनाकडून मिळत असलेला योग्य प्रतिसाद याबाबत साऊ एकल महिला समितीचे जिल्हा समन्वयक कारभारी गरड यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच उपस्थित एकल महिलांना विविध शासकीय योजना, लागणारी कागदपत्र व बाल संगोपन योजनेबाबत माहिती दिली. किशोर मिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या