22.6 C
New York
Wednesday, June 17, 2026

Buy now

spot_img

सौंदाळा शाळेत प्रवेशासाठी झुंबड… पहिल्या दिवशी मोफत पुस्तके व गणवेश वाटप

दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सौंदळा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांची व पालकांची प्रवेशासाठी झुंबड उडाली यामध्ये तालुक्यातील पंचवीस ते तीस किलोमीटर हून पालक मुलाच्या प्रवेशासाठी आले होते.
सौंदाळा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग असून चालू शैक्षणिक वर्षात सहावीचा वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने मंजुरी दिल्याने या वर्षापासून सहावी सुरू होत आहे
प्रवेशासाठी इयत्ता पहिलीसाठी पहिल्याच दिवशी 50 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे दुसरी तिसरी चौथी मध्येही मुलांची प्रवेशासाठी नाव नोंदणी झाली आहे तर इयत्ता पाचवीचे ऍडमिशन पहिल्याच दिवशी फुल झाले आहे
सौंदाळा शाळेत गेल्या वर्षी 198 पट होता पैकी फक्त 98 मुले गावातील होते बाकी सर्व मुले आजुबाजूच्या गावातून येत आहेत एकीकडे जिल्हा परिषद शाळेचा पट कमी होत असताना सौंदाळा शाळेत मात्र प्रवेशासाठी झुंबड पडत आहे
सौंदाळा शाळा गुणवत्तेत आघाडीवर असल्याने पालक मोठ्या प्रमाणात येथे प्रवेश घेत आहेत गेल्या शैक्षणिक वर्षात तेरा मुले सैनिक स्कूल परीक्षेत पात्र ठरले होते नवोदय परीक्षेत 95 पेक्षा अधिक मार्क असलेले 11 मुले आहेत त्या त्यातील एका मुलाने नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला आहे.नुकताच पाचवी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यातील 11 मुलांनी 220 पेक्षा अधिक गुण घेतले आहेत.चौथीच्या मुलांनी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तम गुण मिळाले आहेत .गुणवत्तेबरोबरच हस्ताक्षर स्पर्धेत इयत्ता पाचवीचा अर्णव तळेकर याने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला तर उंच उडीमध्ये आरोही काळे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला
*याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये सौंदळा शाळेचा द्वितीय क्रमांक आला त्याचप्रमाणे मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये तालुक्यामध्ये सौंदाळा शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला आहे* एकूणच मुलांच्या सर्वांगीण विकास सौंदाळा शाळेत केला जात असल्याने या शाळेकडे पालकांचा ओढा जास्त आहे .
दाखल प्रवेश घेतलेल्या मुलांना व शाळेतील सर्वच मुलांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या