*…त्या घरातील माता-भगिनी कधीच भोंदू बाबांच्या नादी लागत नाहीत-डॉ.नागेश गवळी*
नेवासा(तालुका प्रतिनिधी):— ज्यांना फुले शाहू आंबेडकर कळले नाहीत असेच लोक भोंदू बाबांच्या नादी लागतात. देशातील ज्या ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र, महात्मा ज्योतिराव फुले यांचे अखंड, तुकडोजी महाराजांचे चिंतन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व हिंदू कोडबिल आहे, अशा घरातील माता-भगिनी कधीच भोंदू बाबांच्या नादी लागत नाहीत असे स्पष्ट मत समता परिषदेचे प्रवक्ते डॉ.नागेश गवळी यांनी व्यक्त केले.

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे जाणता राजा ग्रुप, सावता परिषद व समता परिषद आयोजित क्रांतिसूर्य
महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्सवात व्याख्यानात डॉ. नागेश गवळी बोलत होते.
शनिवार दि. ११ एप्रिल रोजी कुकाणा येथील साईश्रध्दा लॉन्स येथे महात्मा
आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते
त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा
श्रीमती सुमतीताई घाडगे पाटील (शैक्षणिक), पत्रकार विकास अंत्रे,श्रीरामपुर (साहित्य ), अक्षय बोराडे,जुन्नर (सामाजिक), मतीन भोसले,अमरावती (सामाजिक), विजय देशमुख, सुलतानपूर(कृषी), फुलचंद रोकडे, शेवगाव(सामाजिक), रावसाहेब मगर,शरणपूर वृद्धाश्रम,कौठा (सामाजिक) यांना कार्यगौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
जागृत शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी महंत श्री आवेराजजी महाराज,समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, विभागिय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, रावसाहेब जावळे,विठ्ठल फुलसौंदर,सरपंच लताताई अभंग, अब्दुलभैया शेख,दत्तात्रय काळे, मच्छिंद्र म्हस्के, उत्तमराव पाटील, रामदास गोल्हार, डॉ श्रुती आमले पाटील,सत्यभामा जावळे,
स्नेहा गर्जे,मीरा गुंजाळ,ज्योती मगर,गौरी धाडगे, भानुदास कावरे, नामदेव उंडे, बाळासाहेब पाटील, दिनकरराव गर्जे, एकनाथराव कावरे, अमोल अभंग,डॉ.गणेश आर्ले, भाऊसाहेब सावंत, पत्रकार सुखदेव फुलारी, सुनिल पंडित, अनिल गर्जे, कारभारी गरड, ग्शरद तांबे,भाऊसाहेब काळे, बाबासाहेब काळे, मोहनराव गायकवाड, विष्णू गायकवाड, नंदू चौधरी, देवेंद्र काळे, संतीष फुलारी, भैरवनाथ भारस्कर नीरज नांगरे, इमरान दारूवाला, कैलास म्हस्के, संदिप फुलारी,शकुर शेख आदि यावेळी उपस्थित होते.
*डॉ.गवळी* पुढे म्हणाले की,
महात्मा जोतीराव फुले यांचे शिक्षण हे चिकित्सा करायला लावणारे शिक्षण होते. ‘सत्यमेव जयते’ या अमर संदेशाचा पुनरुच्चार करणारे ते आधुनिक भारतातील पहिले महापुरुष होते. बहुजन समाजाच्या उद्धार करणाऱ्या महामानवांचे स्मृतिस्थाने ही आपली तीर्थक्षेत्रे असावीत. महापुरुषांना जात म्हणून नव्हे तर विचार म्हणून स्वीकारण्याची गरज आहे.
*पुरस्काराला उत्तर देतांना सुमतीताई घाडगे पाटील* म्हणाल्या कि, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा घेऊन साहेबराव घाडगे पाटील यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची स्थापना केली. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी मुलांपेक्षा मुलींची फी कमी ठेवली. शैक्षणिक संकुलाच्या परिसरामध्ये जलसंधारणाचे मोठे काम उभे केले, त्यामुळेच संस्था आज जलस्वयंपूर्ण असून अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ होत आहे.
*पत्रकार विकास अंत्रे* म्हणाले, महापुरुषांच्या विचारांचा वारसा आणि सत्कार्य करणाऱ्यांचा गौरव संत ज्ञानदेवांच्या भूमीत होतं असून सदविचारांची पणती महापुरुषांच्या विचारांचा जागर करून लावली जात आहे. अवती भोवती नकारात्मकतेच्या पायघडया पडत असतांना महापुरुषांच्या विचारांच्या वाटेच्या लढाईला यामुळे बळ मिळत आहे असे सांगितले.

माजी आमदार पांडुरंग अभंग,पत्रकार जगन्नाथ गोसावी यांच्यासह इतर सर्व पुरस्कारार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.
जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे यांनी प्रस्ताविक केले.उपाध्यक्ष राहुल जावळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
जाणता राजा ग्रुपचे अड.गणेश निकम,सुभाष चौधरी, दिनेश व्यवहारे, सेनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, ठाकरे सेनेचे मछिंद्र म्हस्के, मछिंद्र कावरे,राजेंद्र बागडे,अभिजित लुनिया, इनुसभाई नालबंद, मनोज हुलजूते,समिर पठाण,सिध्दार्थ कावरे,राजेंद्र खराडे, कुणाल धाडगे,अक्षय कचरे,जवाहर भंडारी,अशोक भुमकर, प्रफुल्ल जावळे,जावेद शेख,विलास लिपणे, यशराज जावळे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.










