भेंडा – नगरशाही
बळीराजा शिव पाणंद शेत रस्ते योजनेच्या शासनाने २५ मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार रस्ते अडविणाऱ्यावर तातडीने फार्मर आयडी ब्लॉकची कारवाई करावी , अशी मागणी शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी यांना भेटून केली आहे.

राज्य शासनाने वेळोवेळी शेत रस्त्यांबाबत शेतकरी हिताचे शासन आदेश ,परिपत्रके काढलेली आहेत. असे असूनही अद्यापही अनेक शेतकऱ्यांचे रस्ते खुले झालेले नाहीत .आता एक महिन्यानंतर पावसाळा सुरू होत असून रस्त्याअभावी अनेक शेतकऱ्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहे .अनेकांची शेती पडीक आहे .२५ मार्च रोजी काढलेल्या निर्णयानुसार गाव नकाशा वरील तसेच शेत वहिवाटीचे अतिक्रमित व अडविलेले सर्व रस्ते ७ दिवसात खुले करावेत , अशा सूचना सर्व संबंधितांना देऊनही त्यांनी रस्ते खुले न केल्यास महसूल यंत्रणेने तातडीने ७ दिवसात रस्ते खुले करावेत , मागणी केलेल्या सर्व रस्त्यांची तात्काळ मोजणी व सिमांकन करण्यासाठी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करावे , तहसीलदार व प्रांत यांचे कडील प्रलंबीत रस्ता प्रकरणे निकाली काढावीत , रस्ते अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर फार्मर आयडी ब्लॉकची कारवाई करावी , सर्व तालुक्यात क्षेत्रीय समिती स्थापन करून कालबद्ध कार्यक्रम द्यावा , हद्द निश्चिती करताना ग्रामपंचायत , पंचायत समिती व इतर उपलब्ध निधी प्रदान करावा , मोजणी हद्द पूर्ण झालेले रस्त्यांवर लगेच कायमस्वरूपी दगडी खुणा – नंबरिंग करण्यात यावे व प्रती किलोमीटर पंधरा लाख रुपये निधी उपलब्ध करून तातडीने कामे सुरू करावे , सर्व ग्रामपंचायती कडून शेत रस्त्यांचे प्रस्ताव मागणी करावी , विलंब होत असेल तर शेतकऱ्यांनी वैयक्तिक दिलेले अर्ज ग्राह्य धरावेत.

याप्रसंगी शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील,शरद पवळे,कायदा सल्लागार अँड.गोरख कडूस पाटील , सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड , ज्ञानेश्वर जंगले, बाबासाहेब धुमाळ , रामचंद्र अडसरे ,व्यंकटराव धट पाटील, विकास जाधव, माणिक राऊत, संकेत शिंदे,शिवराम निकम, दत्तात्रय काकडे,अशोक कुताळ,फारुख पठाण , शेषराव ठोंबरे , किसन परंडवाल , मच्छिंद्र पवार, कानिफनाथ कदम, प्रशांत चौधरी आदीसह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
वरील अतिशय महत्त्वपूर्ण व शेतकरी हिताच्या समस्या तातडीने मार्गी न लागल्यास जिल्हाभर शांततामय मार्गाने निदर्शन ,आंदोलन करण्यात येईल ,असा इशाराही समक्ष भेटीत निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
याप्रसंगी झालेल्या मार्गदर्शनपर बैठकीत
ऍड.गोरख कडूस यांनी उपस्थित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेत रस्त्याचे व कायद्याबाबत माहिती दिली. बैठकीस रावसाहेब गोरे , वैभव शेळके , श्रीकांत काकडे ,सुरेश गावडे , गोवर्धन निकम ,आसाराम मुटकुळे , अक्षय नेमाणे ,बाळासाहेब वादे ,राजेंद्र वाबळे दत्तात्रय गटकळ , शुभम बोबडे,सागर शेळके , कपिल उल्हारे , बालेखा पठाण,आब्रार सय्यद,नवनाथ रेपाते आदींसह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.










