10.4 C
New York
Tuesday, May 12, 2026

Buy now

spot_img

कुकाण्यात रमजान ईद निमित्त खाकीचा सन्मान दै.नगरशाहीचा सामाजिक उपक्रम

कुकाण्यात रमजान ईद निमित्त खाकीचा सन्मान
दै.नगरशाहीचा सामाजिक उपक्रम
दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी -पोलीस सामान्य माणसाकरीता न्याय भूमिका घेतात.सणासुदीला देखील कुटुंब पासून दूर राहून अहोरात्र कर्तव्य बजावतात.

सालाबादप्रमाणे कुकाणा पोलीस स्टेशन येथे रमजान ईद निमित्त दै.नगरशाही वृत्तपत्र समूह, प्रेस क्लब कुकाणा वसंतराव देशमुख फ्रेन्ड सर्कल तर्फे पोलिस नाईक शहाजी आंधळे,पो.ना.बडे,पो.को.हरीभाऊ धायतडक,पो.को.वासुदेव डमाळे, व सर्व स्टाफचा गुलाब पुष्प व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख,दै.नगरशाहीचे मुख्यसंपादक प्रा. ईस्माइल शेख, पत्रकार प्रा.अनिल गर्जे,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, सामाजिक कार्यकर्ते सलिमभाई इनामदार,सुयोग लॉन चे संचालक मुसा इनामदार, सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हस्के , अँड.सचिन साबळे, ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग बरे, अनिल सुसे, सदस्य ईकबाल इनामदार,किरण शिंदे,इसाक ईनामदार,आजिम सय्यद,ईसाक ईनामदार, सरपंच म्हसरुप मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या