दैनिक नगरशाही भेंडे प्रतिनिधी
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचालित जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये डॉ.सी. व्ही .रमण यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य.बाळासाहेब उगलमुगले, शीला गिरी कुमार, अश्विनी गरड, जयश्री उंडे व जयश्री थोरे उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थिताच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या दिनाच्या निमित्ताने सर्व विज्ञान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विज्ञान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून अविष्कार दाखवला. प्राचार्य बाळासाहेब उगलमुगले यांनी विज्ञान विषयाबद्दल अधिक माहिती सांगताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी भौतिक परिस्थितीचा अभ्यास करून विज्ञानाचे नवनवीन प्रयोग करावे.अध्यापिका जयश्री उंडे यांनी विज्ञान विषयाची प्रश्नमंजुषा घेतली व उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले., जयश्री थोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अपार कष्ट घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गिलबिले व दीपिका देशमुख यांनी केले तर शिक्षिका अश्विनी गरड यांनी आभार मानले.










