2.3 C
New York
Saturday, February 21, 2026

Buy now

spot_img

नैसर्गिक शेतीतूनच पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित : आनंद भंडारी

 

शेवगाव प्रतिनिधी/परविन शेख: “महाराष्ट्रातील

प्रत्येक तालुक्यात जाऊन आपण समाजासाठी काहीतरी योगदान देत आहोत, ही भावना ठेवून सातत्याने काम करत राहिले पाहिजे.” भंडारी यांनी बचत गटांचे महत्त्व सांगत बचत गट ही उद्याची खरी ताकद असून, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील माता-भगिनींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येत आहेत. शेतीतील उत्पादन वाढीसाठी उमेद अभिवान व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञान व प्रशिक्षण मिळत असून, आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक जडणघडणही घडत आहे. रसायनयुक्त अन्नामुळे गंभीर आजारांना निमंत्रण मिळत असल्याने विषमुक्त, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शाश्वत शेती व जलसंवर्धन विषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम शेवगाव पंचायत समिती सभागृहात पार पडला, या वेळी भंडारी बोलत होते. कार्यक्रमात डॉ. अविनाश पोळ यांनी गटशेती कशी करावी, पाणी नियोजन कसे राबवावे, याबाबत मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे जलसंवर्धनासहगटशेती करण्यास महिलांना मोठे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा संदर्भ देत अनेक वक्त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करून महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. समाजासाठी जाण असलेली कार्यकत्यांची फळी उभी करणे हेच खरे परिवर्तन असल्याचे मत या वेळी व्यक्त झाले. नैसर्गिक

शेतीचे महत्त्व स्पष्ट करताना वक्त्यांनी सांगितले की, पैसा व साधनसंपत्ती असली तरी नैसर्गिक व आरोग्यदायी अन्न नसेल तर त्याचा उपयोग नाही. “जसा सैनिक देशाचे संरक्षण करतो, तसाच शेतकरी देश जगवतो,” असे भावनिक प्रतिपादन करत पुढील पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याचे सांगण्यात आले, वाप्रसंगी मंजुषा ठवकर, गटविकास अधिकारी सोनल शहा, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पौळ यांच्यासह प्रशासनातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी लाहणुताई ढवळे, प्रमिला काते, शारदा भालसिंग, जयश्री महाडिक आदी महिलांनी आपले अनुभव व भावना व्यक्त केल्या. विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

ताज्या बातम्या