8.3 C
New York
Sunday, April 12, 2026

Buy now

spot_img

जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी*

.नगरशाही भेंडे प्रतिनिधी
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षणसंस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे ह.भ. प. सोमनाथ महाराज पाटील, पत्रकार नामदेव शिंदे, प्राचार्य बाळासाहेब उगलमुगले, संदीप घोलप, रत्नमाला खराडे, गाडगे रुक्मिणी उपस्थित होते. प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून , पोवाड्यातुन , वक्तृत्वातून शिवरायांच्या विचारांची शिकवण दिली. शिक्षिका रत्नमाला खराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ह.भ.प.सोमनाथ महाराज म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी, विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आपल्या आचरणात आणावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होईल असे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धी नवले व मनस्वी मोरे या विद्यार्थिनींनी केले. तर आभार शिक्षिका सविता गायकवाड यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या