दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे दर शनिवारी होत असलेली पावन हनुमानची आरती व हनुमान चालीसा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतो. आरतीला आलेल्या भाविकांना गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने फराळाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व हिंदू – मुस्लिम लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे जेऊर हैबती येथील हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणून गावातील मस्जिद चे उद्घाटन श्री.ह भ प नाना महाराज सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गावातील दोन्ही समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर ह भ प कृष्णा महाराज उगले,देविदास महाराज म्हस्के, प्रल्हाद भाऊ रिंधे, गुलाब भाऊ उगले,महेश खराडे, महेश उगले रामराव ताके, गजानन देशमुख,देविदास कपिले, अर्जुन कपिले, अंबादास कपिले, शिवाजी कपिले, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अजय रिधे,सर्जेराव पंडित, दत्तू भाऊ ताके, दत्तात्रय शिंदे विठ्ठल जावळे, दत्तात्रय तांबे,अशोक खराडे,पांडुरंग देशमुख,बाळासाहेब रिधे ,संभाजी खराडे, प्रकाश उगले,उद्धव दादा रिधे, कैलास म्हस्के,कैलास शिंदे,चंद्रकांत तांबे, गणू काका शेटे, अरुण शिंदे,परमेश्वर उगले,पका मामा बडे, प्राचार्य म्हस्के सर,प्राचार्य खराडे सर,रामा कराळे आदिनाथ उगले,राम वाघ, अजित शिंदे, भाऊ गवारे, उस्मान भाई, अब्दुलभाई,मोहम्मदभाई,निसारभाई, अमीन भाई, यासीनभाई, ईसुफभाई, गणीभाई, जाफरभाई अमजद भाई, कलीम भाई,मिनाज इकबाल भाई, समीर भाई,रशीद जमादार भाई, कलंदर भाई इकबालभाई, आजरहर भाई,राजुभाई सय्यद आदी उपस्थित होते .तर सर्व शिक्षक वृंद शाळेतील विद्यार्थी यांना पण फराळाचं वाटप करण्यात आले.
जसे तालुक्यात सौंदाळा येथे सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली जातमुक्त गाव घोषित करून जातीचे निर्मूलन केलं तशी ही दुसरी घटना आहे की हिंदू मुस्लिम ऐक्याने तालुक्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे.










