14.3 C
New York
Sunday, March 22, 2026

Buy now

spot_img

जिजामाता पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न,**

दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी
श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्यासह विविध कार्यक्रम सादर केले. शिक्षण संस्थेचे जेष्ठ विश्वस्त अॅड देसाई आंबा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात संचालक शिवाजी कोलते, अशोक मिसाळ, प्रा.नारायण म्हस्के, सेक्रेटरी अनिल शेवाळे, शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे, सरपंच शरद आरगडे, सरपंच वैभव नवले, पत्रकार कारभारी गरड, पत्रकार नामदेव शिंदे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणेश आरगडे, प्रविण घुले, प्राचार्य शिरीष लांडगेपाटील, प्रा.सोपानराव मते, ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील प्रा डॉ . राजेंद्र गवळी आदी या प्रसंगी उपस्थित होते.

प्रारंभी उपप्राचार्य दिपक राऊत यांनी पब्लिक स्कुलचा वार्षिक अहवाल मांडला. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शन भरवले होते. इंग्रजी माध्यमातील शिक्षणातून चांगले नागरिक घडतात. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहून जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्तमानपत्रातील फोटो पाहून आमचा उर भरून येतो,असे अॅड देसाई आबा देशमुख यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधनासह, पर्यावरण, समाज जागृती, देशभक्तीपर गीत यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. वर्षभरात क्रीडा, विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य दीपक राऊत, योगिता शेजूळ, उज्वला फटांगरे, रत्नमाला खराडे, रेखा तरटे, जयश्री उंडे, शीला गिरी कुमार, सविता गायकवाड, सुरेखा राऊत, उज्वला फटांगरे, रुख्मिणी वेताळ, स्वाती सिरसीम, रूपाली करबमळकर, जयश्री थोरे, अमृता कोलते, अश्विनी गरड, अनुजा पाटील, प्रियंका वायकर, मिसाळ अर्चना, अभंग अदिती, शेख तबस्सुम, शितल निकम, रूपाली पाटील, विद्या तानवडे, कोमल ठाणगे, संदीप घोलप, क्रिडा शिक्षक सुदिप खरात, सचिन गावडे,, बापूसाहेब टेकणे, प्रविण कोकरे, सुनिल शिंदे, अनिल शेळके, कोलते मावशी, कुलकर्णी मावशी, फुलारी मावशी, अढागळे बाबा यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व आजी- माजी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .मयुरी रिंधे, श्रुतिका क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. शिला गिरीकुमार यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या