नेवासा प्रतिनिधी
काल पार पडलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारून 70 पैकी 45 प्लस जागा निवडून येउन बहुमतात सरकार विजय झाल्याबद्दल नेवासा शहर भारतीय जनता पार्टी व तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा, व युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा भाजप शहराध्यक्ष रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खोलेश्वर मंदिर चौकात आज फटाके व गुलालाची उधळण करत व सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा यांनी दिल्ली येथील विधानसभेच्या अभिमानास्पद विजयाबद्दल सर्व भाजप कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व एकमेकांना पेढे भरले.
त्यानंतर युवा नेते ऋषिकेश येथे यांनी बोलताना म्हणाले की दिल्लीवासी 27 वर्षापासून वनवास भोगत होते आज दिल्ली येथे रामराज्य स्थापन झाले त्याचाच आनंद उत्सव म्हणून नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहोत व या पुढील निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्व निवडणुका लढवणार आणि जिंकेल आणि आम्ही कार्यकर्त्यांमागे सक्षमपणे उभे राहू. असे बोलताना म्हणाले नंतर ज्येष्ठ नेते अशोकराव ताके यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर भाजप शहराध्यक्ष रोहित जी पवार यांनी नेवासा नगरपंचायत वर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकवणार म्हणजे करताना यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने प्रयत्न करत आहोत
याप्रसंगी बोलताना म्हणाले. याप्रसंगी नेवासा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मुथा, भाजप शहर उपाध्यक्ष शंकर कनगरे, वैद्यकीय आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कोलते युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे,माजी सरपंच सतीश गायके, भाजपचे नगरसेवक इंजिनिअर सुनील वाघ, ओबीसी भाजपा अध्यक्ष विलास बोरुडे, सरचिटणीस गोरक्षनाथ बेहले, अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, विवेक ननवरे किशोर मगर ,गणेश पवार संजय पटारे युवा नेते कुणाल बोरुडे, अनिल परदेशी प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे, प्रतीक शेजुल, सचिन भांड, धर्म रक्षक गणेश चौगुले शहर सचिव निखिल जोशी, नाना संगपाळ, सुधाकर शेंडे ,संतोष चांदणे, किरण दारुंटे आदी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते