कुकाणा व तरवडी पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे भक्तीमय वातावरणात प्रस्थान
वारकऱ्यांना रेनकोट, टोपी. टॉर्च व वॉटर बॅग वाटप
नेवासा :
आषाढी वारी निमित्त कुकाणा व तरवडी
( ता. नेवासा ) पायी दिंडी सोहळा रविवार ( दि.१२ ) रोजी विठुबा – रुखमाईच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूरकडे मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले.
या सोहळ्याचे दिंडी प्रस्थान पुजन, विना पुजन, रथ व पादुकाचे पूजन माजी आमदार तथा संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, ॲड. देसाई देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, सरपंच लताताई अभंग, उपसरपंच शुभांगी कचरे, माजी सरपंच एकनाथ कावरे, माजी उपसरपंच बाळासाहेब कचरे, तरवडी गावच्या सरपंच स्वप्नाली क्षिरसागर, उपसरपंच
रेखा घुले, अशोक चौधरी, ग्रापंचायत सदस्य रज्जाक इनामदार, जवाहर भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुस्लिम समाजातील सिकंदर तोलाजी शेख यांनी नाष्टा दिला, त्यांचा मा सरपंच एकनाथ कावरे यांनी सत्वेकार केला.यावेळी अंबादास कचरे,सुरेश हिंगे,पापाभाई शेख, उपस्थित होते.
यावेळी कुकाणा – तरवडी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना ज्ञानेश्वरचे संचालक , युवा नेते अमोल अभंग मित्र मंडळ व जाणता राजा ग्रुपचे वतीने रेनकोट व वॉटर बॅग, भंडारी क्रिएशनचे संचालक जवाहर भंडारी यांच्या वतीने कॅप तर किरण सेल्सचे संचालक सुनिल बोरा यांच्या वतीने रेनकोट, वसंतराव गरड यांनी बॅटरी असे प्रवास साहित्य माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक चौधरी, माजी सरपंच एकनाथ कावरे, जवाहर भंडारी, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गणेश निकम, सरपंच भाऊसाहेब सावंत, ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे, उपाध्यक्ष राहुल जावळे, सुनील गोर्डे , सुभाष चौधरी, सिद्धार्थ कावरे, मनोज हुलजूते,अँड राजेंद्र खराडे , अँड शेखर गोर्डे, ईन्नुसभाई नालबंद जावेद शेख, समीर पठाण, विलास लिपणे, निखील विधाटे, कैलास म्हस्के आदि़च्या हस्ते वाटप करण्यात आले.


आषाढी वारीनिमित्त कुकाणा व तरवडी येथील शेकडो वारकरी सहभागी असलेल्या दिंडी व पालखी सोहळ्याचे रविवारी कुकाणा येथील विठ्ठल मंदिरा पासुन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. जाणता राजा ग्रुप व अमोल अभंग मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

या दिंडी सोहळ्याचे ठिक – ठिकाणी फटाक्यांची अतिषबाजीने स्वागत केले.या सोहळयाप्रसंगी माजी सरपंच दौलतराव देशमुख, उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, बबन महाराज पाटेकर, सुरेश महाराज राजगुरु, दिंडी चालक सुभाष पवार, अनिल पंडित, राजेंद्र निकम, अनिल गर्जे, कांता दरंदले,विष्णुपंत पवार, बाळासाहेब पाटील, आत्माराम लोंढे, शिवाजी कचरे, सिताराम बरबडे, सुभाष विधाटे, रथ चालक अण्णासाहेब कावरे, रमेश सोनवणे यांच्या सह भजनी मंडळ, भाविक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वारकऱ्यांसह उपस्थित भाविक व दिंडीचे स्वागत करून इंजिनियर बाळासाहेब कचरे, यांच्या निवासस्थानी नाश्ता देण्यात आला.
(सोबत फोटो आहे )

फोटो ओळी:_
कुकाणा व तरवडी पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान रथ व पादुकाचे पूजन करताना सरपंच लताताई अभंग व भाविक ( छाया: सुनिल पंडित )










