विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी एसटी बस सुरु
दै.नगरशाही
रांजणगांवदेवी (प्रतिनिधी ) नेवासा तालुक्यातील रांजणगांव – कारेगांव साठी अगदी ४० -४५ वर्षापूर्वी जेंव्हा दळणवळणाची साधने अल्प प्रमाणात होती ग्रामीण भागात रस्त्यांची कोणतीही सुविधा नव्हती तेव्हा नगर आगाराची रांजणगांवदेवीअशी मुक्कामी बस सुरू होती हीबस अगदी नित्यनेमाने पाण्यापावसात नगर येथून सायं ५.०० वाजता निघुन ७.०० वाजता रांजणगांव मुक्कामी येत असे दुसऱ्यादिवशी सकाळी ७.०० वाजता भेंडा फॅक्टरी नेवासा फाटा मार्गें नगर ला पोहचत असे परंतू नंतरच्या काळात जसजशा सुविधा वाढत गेल्या पक्के डांबरी रस्ते झाले . नंतर बसला पाहीजे तेव्हडे उत्पन्न मिळत नाही म्हणून नगर डेपोने सदरची बस बंद केली त्यानंतर अनेक वेळा ग्रामस्थांनी प्रयत्न केले परंतू यश मिळाले नाही ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर नेवासा आगाराने ही बस काही काळ पुन्हा सुरू केली व काही काळ नियमित सुरु ठेवलीवपुन्हा बंद केली आज२०वर्षानंतरआमदार विठठ्लराव लंघे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नेवासा आगाराची नेवासा – शेवगांव ही बस वडाळा – कारेगांव भेंडा शेवगांव या मार्गे सकाळी १०.०० वाजता व परतीच्या प्रवासासाठी शेवगांव येथून सायंकाळी ४.३० वाजता शेवगांव भेंडा – रांजणगांव – कारेगांव – वडाळा – नेवासा अशी बस सुरु करण्यात आली आज सकाळी ११.०० वाजता रांजणगांव येथे बसला हार व नारळ वाढवून शुभारंभ केला या प्रसंगी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर उपस्थित रहाण्याच्या दृष्टीने तसेच जेष्ठ नागरीकांना महिलांना प्रवासासाठी या बसचा निश्चित उपयोग होईल प्रतिनिधी म्हणुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणे हे माझे कर्तव्य आहे त्या दृष्टीने मी काम करत आहे. या प्रसंगी नेवासा डेपोचे वाहतूक निरिक्षक मुरदारे विश्वास काळे ,सिद्धांत दादा नवले ,जालींदर वाकचौरे सरपंच सोपान लोखंडे, गणगे नाना ,अशोकराव लंघे तेलंकुडगांवचे सरपंच सतिष काळे, अंबादास उंदरे ,बाबासाहेब आल्हाट, बबनराव शिंदे बाबासाहेब चौधरी ,दत्तू वाकचौरे , बबन आल्हाट, पेहेरे महाराज तुषार शिंदे ,आदेश जावळे ,पेत्रस कांबळे बबन जावळे ,गोरख सातदिवे ,जनार्धन शिंदे ,हरीभाऊ कापसे, विजय वाकचौरे ,बाबासाहेब जावळे ,पत्रकार सोपान भगत ,अशोक पंडित अदि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आदेश जावळे यांनी केले तर आभारप्रदर्शन सोपान लोखंडे यांनी केले










