14.8 C
New York
Saturday, April 11, 2026

Buy now

spot_img

*उद्या कुकाण्यात जाणता राजा ग्रुपच्या”कार्यगौरव पुरस्कार”वितरण समारंभाचे आयोजन

“कार्यगौरव पुरस्कार”प्राप्त मान्यवरमध्ये
घाडगे, अंत्रे, बोराडे, भोसले, देशमुख, रोकडे व मगर यांचा समावेश

दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी/समीर शेख: कुकाणा ता.नेवासा येथील जाणता राजा ग्रुप च्या वतीने उद्या शनिवार दिनांक ११ रोजी कार्यगौरव पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले
घाडगे, अंत्रे, बोराडे, भोसले, देशमुख, रोकडे व मगर यांचा समावेश
सावता आणि
समता परिषदेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागेश गवळी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना कार्यगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जाणता राजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील गजें व समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल जावळे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील साईश्रध्दा लॉन्स येथे शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी महंत आवेराजजी महाराज यांच्याहस्ते तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग
यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार विठ्ठलराव लंघे, अँड. देसाई देशमुख, पोलीस निरीक्षक महेश पाटील, समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिदे, विभागीय अध्यक्ष मच्छिद्र गुलदगड, सदगड, रावसाहेब जावळे, सावता परिषद प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान महासचिव डॉ. राजीव काळे, कॉ. बाबा आरगडे, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे, सरपंच लताताई अभंग यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमास लाभणार आहे.

कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जाणता
राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुनील गजें, उपाध्यक्ष राहुल जावळे, युवानेते अमोल अभंग यांनी केले आहे. पुरस्कारार्थी मध्ये अँड.सुमतीताई घाडगे पाटील-त्रिमूर्ती शैक्षणिक संस्था नेवासे फाटा (शैक्षणिक), विकास अंत्रे वृत्त संपादक दैनिक पुण्यनगरी व साहित्यिक (साहित्य), अक्षय बोराडे-शिव ऋण प्रतिष्ठान, जुन्नर (सामाजिक), मतीन भोसले आदिवासी आश्रमशाळा, अमरावती (सामाजिक), विजय देशमुख-सुलतानपूर, ता. नेवासे (कृषी), फुलचंद अण्णा रोकडे शेवगाव (सामाजिक), रावसाहेब मगर-शरणपूर वृद्धाश्रम, कौठा, ता. नेवासे (सामाजिक) यांचा समावेश आहे.

Related Articles

ताज्या बातम्या