भेंडा – प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील तरवडी हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून सत्यशोधक व साहित्यिक दीनमित्रकारांच्या कार्याने राज्यात परिचित आहे .अशा ठिकाणी मराठी भाषा दिनानिमित्त होत असलेले साहित्य संम्मेलन नव साहित्यिकांना प्रेरणादायक राहील,असे साहित्य संम्मेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ विधिज्ञ देसाई देशमुख म्हणाले.
तरवडी तालुका नेवासा येथे सुसंकल्प साहित्यिक व सामाजिक संघटनांच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त साहित्य संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी कवी – गितकार बाबासाहेब पवार होते.उदघाटक ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. देसाई देशमुख, स्वागताधाक्ष संजय फंड, कथाकर भाऊसाहेब सावंत,स्वराज्य फिल्म प्रोडक्शनचे गिरीश राजूरकर ,निर्माता दिग्दर्शक बाळासाहेब बांगर, सुरेश कांबळे, डॉ.शाम जाधव, मौलाना शमशाद शाहिद पठाण, फादर राजेंद्र कांबळे, भंतेजी पाटेकर, पंचपुरी महाराज, शिवाजी बिरदवडे महाराज, राष्ट्रवादीचे अब्दुलभैय्या शेख, समता परिषदेचे राहुल जावळे आदीं व्यासपीठावर उपस्थित होते.आ.विठ्ठलराव लंघे यांनी सदिच्छा भेट दिली.

प्रास्ताविकात साहित्य संम्मेलन आयोजक व दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त साहित्यिक सायमन भारस्कर यांनी वाचन संस्कृती वाढीस लागावी,नव साहित्यिकात वाढ व्हावी,या उद्देशाने साहित्य संम्मेलनाचे आयोजित केल्याचे सांगितले.याप्रसंगी,राजेंद्र फंड, भाऊसाहेब सावंत,गिरीश राजुरकर,बाळासाहेब बांगर, अब्दुलभैय्या शेख, प्रा.संजय दरवडे आदींनी मनोगत व्यक्त केले.संम्मेलनास डॉ.बेनझिर शेख, कविता आढागळे, बाळासाहेब मंतोडे, ऍड.संजय माकोणे,मनिष मुथ्था,रामभाऊ आवारे, बाळासाहेब कोठुळे ,सुनिता वाळुंज, ॲड.विजयकुमार कस्तुरे, बबनराव महामुनी,बाळासाहेब कनगरे, दिलीप मांडलिक ,प्रभाकर खंडागळे ,अरुण मिसाळ,तसेचअहिल्यानगर ,बीड,नांदेड,बुलढाणा,अमरावती,संभाजीनगर, पुणे,नाशिक, पुरंदर आदी जिल्ह्यातील साहित्यिक,कवी, लेखक, विचारवंत, सिनेकलावंत यांची उपस्थिती होती.
दुपारच्या सत्रात कवी मोहिनीराज होन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संम्मेलनात उपस्थित कवींनी सत्यता, दांभिकता,विडंबन, अनिष्ट रुढी परंपरा यावर दर्जेदार कविता सादर केल्या.सर्वेश सचिन सदावर्ते या बाल साहित्यिकाने माय मराठीवर उत्कृष्ट काव्य सादर केले.
कविता सादर करणाऱ्यांमध्ये मोहिनीराज होन (बाप माझा शेतकरी ), रुपचंद शिदोरे (पर्यावरण ), डॉ.बेनझिर शेख ( होय मी शिवबा बोलतोय ), निवृत्ती महाराज कानवडे ( दारुड्या ), गोरक्षनाथ पवार ( दवबिंदू ), बाळासाहेब मंतोडे (नंदी ), प्रवीण गवळी ( सये ), ऍड.संजय माकोणे ( माऊली ), डॉ. बाळासाहेब वाहूरवाघ ( कळेना गुज ), सुनिता वाळुंज ( विठ्ठल माऊली ),सुरेश वैरागर ( बापाची कुटी ),कविता आढागळे ( माय ), सुनीता कपाळे ( काहूर ), विजय पांचाळ ( वंशाचा दिवा ), गणपत पुंड ( फुले तुम्ही परत याल का ? ), बाळासाहेब हळनोर ( देवा तुझ्या गाभाऱ्यात ), बबनराव महामुनी ( प्रश्न ),डॉ. विजयकुमार कस्तुरे ( एक कवितेमुळे ), कारभारी गरड (लोकशाहीत हवं लोककारण ), एकनाथ घोलवाड ( मान्हा लेकरू ), बाळासाहेब कोठुळे ( परमार्थ ),राजेंद्र फंड (गाडगेबाबा हवे होते ),ऍड.अण्णासाहेब मोहन( अबला ), ऊषाताई पवार,अब्दुल्ल शेख, बाबासाहेब पवार
आदींचा सहभाग होता.
संम्मेलन यशस्वीतेसाठी हरीभाऊ गवळी, शंकर कन्हेरकर,बंडु नाईक,सुधिर भारस्कर, अनिकेत भारस्कर,दत्तु भारस्कर,अनिल सरोदे, संजय वाल्हेकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कवी बाळासाहेब कोठूळे यांनी केले.










