6.3 C
New York
Friday, April 10, 2026

Buy now

spot_img

साहेबरावजी घाडगेपाटील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, ढोरजळगांव-ने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दै.नगरशाही ढोरजळगावने प्रतिनिधी –

शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, ढोरजळगांव-ने येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण संकुल परिसर भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संकुलाचे मुख्य प्रशासन श्री. सचिनराव कर्डिले सर, सीनियर कॉलेजचे प्राचार्य चोळके सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य भोईटे सर, माध्यमिक विभागाचे प्राचार्य आशिष भारती सर, पब्लिक स्कूलचे प्राचार्य बुधवंत सर, मुख्याध्यापिका श्रीमती झिंजुर्डे मॅडम, डी.एड. कॉलेजचे प्राचार्य नवल सर तसेच सीनियर कॉलेज विभाग प्रमुख संदीप घोडेचोर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी शिवव्याख्याने सादर केली. कुमारी देशमुख श्रुतिका, कुमारी कळमकर सिद्धी, कुमारी बानगुडे प्रतिभा, कुमारी डिके मानवी, कुमारी शिंदे अंजली, कुमार गोंदणे गोरक्षनाथ, कुमार जगदाळे अर्णव, कुमार श्रुती खैरे, कुमार दातीर गौरव व कुमारी किरण रोजनकर यांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून शिवचरित्राचा गौरव केला. त्यांच्या भाषणातून शिवाजी महाराजांचे धैर्य, संघटन कौशल्य, शिस्तप्रियता आणि राष्ट्रनिष्ठा यांचा प्रभावी आढावा घेण्यात आला.

संकुलाचे मुख्य प्रशासन श्री. सचिनराव कर्डिले सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजणे ही काळाची गरज आहे. आजच्या पिढीने शिवाजी महाराजांचे आदर्श, कर्तव्यनिष्ठा आणि नेतृत्वगुण आत्मसात करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे.” त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमादरम्यान शिवगर्जना, पोवाडे आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसर “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणांनी दुमदुमून गेला.

या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन प्रा. आकाश मिसाळ सर यांनी करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

अशा प्रकारे शिवजयंतीचा हा सोहळा अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

ताज्या बातम्या