दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी/समीर शेख
नेवासा पोलीसांची दमदार कारवाई देशी बनावटीची पिस्टुल बाळगणा-या आरोपीस ३ जिवंत काडतुसे, १ मॅगझीन, एक मालवाहु वाहन असा एकुण ४,५०,९००/-रु किमतीच्या मुददेमालासह केले जेरबंद
दिनांक १४/०२/२०२६ रोजी पोहवा शहाजी आंधळे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, कुकाणा गावात नेवासा फाटा ते शेवगाव जाणारे रोडवर कुकाणा दुरक्षेत्रा समोर एक सुझुकी कंपनीच्या गाडीक. एम.एच. १६ सी.डी. ४४०५ मधील एका इसमाकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोहवा शहाजी आंधळे यांनी लागलीच मिळालेली माहीती वरिष्टांना कळवुन कुकाणा दुरक्षेत्र येथे दोन पंचांना बोलावुन कुकाणा दुरक्षेत्र येथील पोशी अमोल डमाळे, होम बाळु सावंत, होम प्रशांत चव्हाण, होम चंद्रकांत घाडगे, होम श्रीथर लिपणे, अशांना बोलावुन मिळालेल्या माहीती थोडक्यात सांगुन माहीतीची खात्री करण्यासाठी कुकाणा येथील तरवडी चौक येथे सापळा रचुन थांबले मिळालेल्या माहीती प्रमाणे एक मालवाहु वाहण क. एम. एच. १६ सी.डी. ४४०५ असे तरवडी चौकात आले असता त्यास आम्ही थांबवुन पंचासमक्ष त्यातील चालकाला त्यास त्याचे अंगझडती घेण्याचा कायदेशीर उददेश सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १. संतोष कारभारी नरोटे वय. २२ वर्ष रा. मोहरी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर असे सांगुन त्याची अंगझडती घेतली असतात्याचे कमरेलाएक देशी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह मिळुन आले पंचासमक्ष मॅगझीन खोलुन पाहिले असता त्यामध्ये तिन जिवंत काडतुस मिळुन आल्याने नमुद आरोपीस पिस्तुल वे परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. नमुद आरोपीने सदरचे गावठी बनावटीचे पिस्तुल बेकायदेशीर पणे स्वतःचे कब्जात बाळगल्याची खात्री झाल्याने नमुद आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या मुददेमालाचे वर्णन :-
१.५०,०००/-रु कि.चा एक स्टील सारखे धातुचा त्यास बाउन रंगाची ग्रीप असलेला गावठी पिस्टल त्यास बॅरेल, मॅक्झीन, ग्रीप, टिंगर असलेला गावठी बनावटीचा। पिस्टल जु.वा. कि.अं
२.९००/-
रु कि. चे तिन जिवंत काडतुस जु.वा.कि.अं
३.४,००,०००/-रु कि. चे एक सुझुकी कंपनीची सुपर कॅरी सी. एन. जी मॉडेल ची मालवाहतुक गाडी कु. एम.एच. १६ सीडी ४४०५ अशी जु.वा.कि.अं
एकुण ४,५०,९००/-रु
येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचा मुददेमालदोन पंचासमक्ष जप्त करून आरोपी नामे संतोष कारभारी नरोटे वय. २२ वर्ष रा. मोहरी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर याचे विरोधात पोशी अमोल डमाळे यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे गु. रंनं १११/२०२६ शस्त्र अधिनीयम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो श्री सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर श्री सोमनाथ वाकचौरे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव श्री निरज राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. महेश पाटील, सपोनि अमोल पवार, पोसई अहिरे, पोहवा शहाजी आंधळे, पोशी अमोल डमाळे, पोशी संदीप ढाकणे, होमगार्ड बाळु सावंत, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत घाडगे, श्रीधर लिपणे, यांनी केली असुन नमुद गुन्हयातील आरोपी अटक करण्यात आला आहे. असुन पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहे.










