-14.9 C
New York
Sunday, February 8, 2026

Buy now

spot_img

जि प शाळेमुळेच देशामध्ये खरी प्रगती झाली आहे – आ. सत्यजित तांबे

भेंडा – (प्रतिनिधी ) ज्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ जि प शाळेत सहभाग घेवून बारकाईने लक्ष देतात त्याच शाळा व्यवस्थित चालू आहेत . जि प शाळेतूनच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे संवर्धन होण्यास मदत होते असे आवाहन नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार – आ . सत्यजित तांबे यांनी केले .
नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील जिजामाता महाविद्यालय, भेंडा फॅक्टरी पी एम श्री शाळा, भेंडा खुर्द जि प शाळा तसेच भेंड बु फुलारी वस्ती जि प शाळा या चार शाळेला आमदार – सत्यजित तांबे यांनी प्रत्येकी एक पोडीयम अंदाजे किंमत (एक लाख रुपये ) त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दिला .
आ सत्यजित तांबे यांचे हस्ते भेडा येथील फूलारी वस्ती शाळेत पोडीयमचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी त्यांचा भेंडा ग्रामस्थांच्या व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक – संजय वाघ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
आ तांबे पुढे म्हणाले जि प शाळेतील शिक्षक कृतीशिल असतील तरच या डेस्कचा उपयोग मुलांसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो या डेस्कमध्ये नविन तंत्रज्ञान युक्त भरपूर सुविधा दिल्या आहेत .महिन्यातून एकदा तरी एखादा डॉक्टर किंवा व्याख्याता आणून मुलांना चांगले मार्गदर्शन देऊन या डेस्कचा वापर खऱ्या अर्थाने मुलांना साठी झाला पाहिजे .
यावेळी कार्यक्रमास जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य – डॉ शिरिष लांडगे, डॉ संभाजी काळे, डॉ शिवाजी शिंदे, अजित मुरकुटे, माजी सरपंच – नामदेव निकम, डॉ संतोष फुलारी,अशोक वायकर, नामदेव शिंदे, अभिजित लुणीया, बलभिम फुलारी, किशोर भणगे,पंढरीनाथ फुलारी, श्रीपत फुलारी, संजय कडुस, संजय भुसारी, बाबा गव्हाणे, नवनाथ फुलारी, किशोर फुलारी, संदिप फुलारी, रामभाऊ गवळी, प्रा काकासाहेब लांडे, अशोकराव लोहकरे,भावराव मुळे प्रदिप शेंडगे, सौ शितल कोरडे, सौ लवांडे, सुरेश तळेकर, विजय तवार, हरिभाऊ ठोंबरे आदी उपस्थित होते शिक्षक अंबादास कोरडे यांनी आभार मानले .

Related Articles

ताज्या बातम्या