*दै.नगरशाही प्रतिनिधी/समीर शेख
*नेवासा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा अजित दादांच्या माध्यमातून नेवासा शहराला बारामती सारखे विकसित करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेवासा नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान ,
अब्दुल भैय्या शेख यांनी मतदार राजाशी संवाद साधला ,
नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री *. सचिन विलास कडू* व प्रभाग क्र. 7 मधील उमेदवार *सौ. रोहिणी अल्पेश बोरकर* यांनी नेवासा शहरात दौरा करून नागरिकांची भेट घेतली व संवाद साधला.
या भेटीदरम्यान नागरिकांना *‘घड्याळ’ चिन्हासमोर मतदान* करण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी प्रथमच निवडणूक लढवत असून *सन्माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली* तसेच *माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे* , *माजी आमदार पांडुरंग जी अभंग,माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील* ,यांच्या साथीने नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम काम करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले.
आगामी काळात *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला* सत्तेची संधी मिळाल्यास नेवासा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
प्रचार प्रसंगी उपस्थित मान्यवर
प्रचार दौऱ्यादरम्यान खालील मान्यवरांची उपस्थिती होती :
*युवा नेते शरदभाऊ जाधव, मकरंद राजहंस, बाबासाहेब नवथर, महेंद्र आगळे, अल्पेश बोरकर, चैतन्य कुलकर्णी, प्रदीप माने, कृष्णा कोकणे, आर्यन शिंगी, श्रेयांश शिंगी, संतोष गाडे, सचिन दहिफळे, महेश कांडेकर, केशव जायभाय, अनिकेत शिरसाट, सचिन बनकर, राजू भाई शेख, महेंद्र पाटील आगळे, सतीश गोर्डे, राहुल चाबुकस्वार,* आदिंची उपस्थिती होती.










