23.6 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img

सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून तालुक्याचा विकास करणार लोकनेते आमदार विठ्ठलराव लंघे

कुकाण्यात रस्ताकामाचे लोकार्पण
दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी

माझे कार्यालय फिरते आहे. कुणालाही कुठेही भेटतो. शिक्षण व संस्कार हीच वडिलांकडून मला मिळालेली प्रॉपर्टी आहे. जनतेने आमदारकीचे शस्र माझे हाती दिले असून त्यातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून चांगला तालुका घडवायचा आहे त्यासाठी मन स्वच्छ ठेवून काम करत आहे. चांगल्या कामास सहकार्य करा, असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी कुकाण्यात केले. रविवारी (दि. २०) सकाळी कुकाणा येथे चौधरी कॉलनी ते मुख्य रस्ता या दहा लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉक रस्ता कामाचे लोकार्पण आमदार लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या हस्ते झाले. अमोल अभंग यांनी प्रास्तविक केले.

आमदार लंघे यांनी कुकाणा व जेऊर हैबती ग्रामपंचायत कार्यालयांच्या नव्या इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, स्थानिक विकास निधीला वर्षभरात काही मर्यादा असल्यातरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून

  1. नियोजन मंडळाकडून निधी मिळवून
    विकास कामे करू, शासनाच्या योजनाचा लाभ धडाडीने जनतेला मिळवून देणार आहे.

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. वीजप्रन्न असून नेवासा फाट्यावरिल ग्रामीण रुग्णालय शंभर खाटाचे केले जाणार आहे. कोणत्याही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सूचना केल्या, तर त्यांचा आदर करणारं आहे,असे
आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सांगितले.

कुकाणा येथे रस्ताकामाचे लोकार्पण करताना आमदार विठ्ठलराव लंघे, सरपंच लताबाई अभंग, सचिन देसरडा यांच्या हस्ते पार पडला.

ज्ञानेश्वर विकास आराखडा
प्रकल्पाबाबत विधानसभा कामकाजात लक्ष वेधल्याबद्दल आमदार लंघे यांचे मा.आमदार अभंग यांनी आभार मानले.

मुळा नेवासा-शेवगाव मार्गाचे चौपदरीकरण, एस. टी. बसस्थानक, पोलिस ठाणे या सह कालव्याची प्रवाह क्षमता वाढवणे आदी प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

यावेळी कुकाण्याच्या सरपंच लताबाई अभंग, अशोक चौधरी, लीला बरमेचा, अब्दुल शेख, ज्येष्ट नेते भैयासाहेब देशमुख, बबनराव पिसोटे, अंकुश काळे,शिवसेना नेते रामदास गोल्हार, काशिनाथ नवले, सरपंच संघटनेचे दिनकर गर्जे, अरुणकुमार देशमुख मा.सरपंच एकनाथ कावरे,बाळासाहेब कोलते,, विजय आव्हाड, माजी सरपंच दौलतराव देशमुख,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विलास देशमुख, किरण शिंदे, डॉ. गणेश आर्ले, शंकर भारस्कर, विष्णू पवार, मच्छिंद्र कावरे, नवनाथ साळुंके,,पत्रकार सुनिल पंडित, पत्रकार अनिल गर्जे, दादासाहेब गवळी, बाबासाहेब नाईक,अड राजेंद्र खराडे,समीर पठाण,नामदेव उंडे,सुभाष भंडारी,रज्जाकशहा ईनामदार. , नवनाथ साळुंके, शाखाधिकारी बिरबल दरवडे ,शिवसेनेचे पवार, मा.सरपंच बाबासाहेब घुले,उपस्थित होते.
प्रा. शकूर शेख यांनी सूत्रसंचालन केले, तर अब्दुल शेख यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या