पानेगांव (वार्ताहर)- बागायती भागातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात US 7711 बाजरी शेतकऱ्यांनसाठी वरदान ठरत असल्याचे पानेगांव (ता. नेवासे) येथील महादेव सभामंडपात आयोजित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पानेगांव ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जंगले यांनी सांगितले.
जंगले यांनी सांगितले की, मी स्वतः हे बाजरी वान केलेले आहे .उन्हाळ्यात बाजरी पिकं घेऊन भरघोस उत्पादन घेतले कमी खर्चात कमी पाण्यात तसेच वन्य प्राणी, किडींचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांन साठी फायदेशीर ठरेल. ऊस जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तोड संपल्यावर गहू, मका पिकाला पर्याय म्हणून शेतकरी आता उन्हाळ्यात बाजरी पिकाला पसंती देत आहे. सध्या राहुरी, नेवासे, श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी बाजरी पिकं पेरणी झालेली दिसून येत असल्याचे जंगले यांनी सांगितले.
उन्हाळी US7711 बाजरी पिकाविषयी संपूर्ण माहिती कंपनीने अधिकारी शिंदे साहेब यांनी देवून कमी खर्चात शेतकऱ्यांनसाठी US ॲग्रीसीड्स कंपनीची बाजरी शेतकऱ्यांनसाठी फायदेशीर ठरतं असून शेतकरी वर्ग US 7711 बाजरीला पसंती देत असल्याचे सांगितले.
यावेळी हभप ज्ञानदेव गुडधे,संजय जंगले,मोहनराव जंगले, बाबासाहेब वाघुले, आण्णासाहेब भालसिंग बबनराव जंगले राजेंद्र जंगले, शिवाजी जंगले,भाऊसाहेब जंगले, विक्रम जंगले, ज्ञानेश्वर काकडे,कचरु कापसे, तुकाराम जाधव, नामदेव गुडधे, गजानन चिंधे, गंगाराम जंगले, नामदेव चिंधे, गोविंद चिंधे, आनंदा जंगले,नारायण जंगले,
आदींसह शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
—प्रतिक्रिया – US7711 उन्हाळी बाजरी शेतकऱ्यांनसाठी फायदेशीर ठरत असून खरीप हंगामात कमी जास्त प्रमाणात होणारा पाऊस त्यामुळे आता बाजरी पिकाला बागायती भागात उन्हाळी महत्त्वपुर्ण पिकं म्हणून पाहिले जाते आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन त्याच बरोबर मका भुईमूग उशिरापर्यंत होणारा गहू पिकाला चांगला पर्याय आता उन्हाळी बाजरी उत्पादन घेणे आवश्यक आहे – जगन्नाथ नवगिरे
गुरुदत्त कृषी मार्गदर्शक