29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

पशुधन व्यवस्थापन संबधित शिबीर व व्याख्यान भेंडा येथे संपन्न

*..*दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर, व पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी संलग्न श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, ज्ञानेश्वरनगर,भेंडा येथे दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी पशुधन व्यवस्थापन संबंधित शिबीर व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर येथील मा.कार्यकारी परिषद सदस्य श्री.आर.एस. खांदे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तसेच पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे सहयोगी प्राध्यापक डॉ.एम.डी.खरवडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. सदर शिबिरामध्ये दैनंदिन आहारात अंड्याचे आहारातील महत्व या विषयावर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे समन्वयक डॉ.पंडित नांदेडकर साहेब यांनी अंड्याचे आहारात असणारे महत्व पटवून देताना अंडे हे शाकाहारी आहे याविषयी माहिती दिली.तसेच अंड्यातील असणारे विविध घटक, शरीराची पचनीय क्षमता, आहारात प्रती वर्षी शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी अंड्यांचे प्रमाण याविषयी सखोल माहिती दिली.

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे नारे दिले. याप्रसंगी उपस्थित सर्वाना आहारातील अंड्याचे महत्व व समाजामध्ये अंड्याविषयी असणारे गैरसमज याविषयी जनजागृती व्हावी असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री.सोपान मते यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी श्री.योगेश बानकर, श्री.सुमित कापसे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक डॉ.शरद शिंदे , श्री.अभिजित भणगे, श्री.धनंजय अंबुले, श्री.गौरव ठुबे, श्री.प्रमोद बर्डे, श्री.काकासाहेब उकिर्डे व डॉ.कृष्णा चामुटे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या