*शिक्षक समन्वय संघाच्या शिक्षकांनी घेतली मा.ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट*
जालना प्रतिनिधी :
जालना येथे राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब हे आले असता त्यांची आपल्या शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये ज्ञानेश चव्हाण, शंकर शेरे ,सदानंद लोखंडे, विजय सुरासे व (बरेचसे बांधव उपस्थित होते शिक्षक उपस्थित होती .यावेळी बोलताना आपल्या शिष्टमंडळांनी मा.ना. एकनाथरावजी शिंदे साहेब सांगितले की आपल्या कार्यकाळात दोन टप्पे मिळाले आहे यासंदर्भात आपल्या कार्यकाळात शासन निर्णय सुद्धा झालेला आहे परंतु त्या निर्णयाला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद न झाल्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर पगार झालेला नाही .त्यामुळे शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपण मा. ना. दादा भुसे व मा. ना.अजितदादा पवार साहेब यांना बोलून तात्काळ येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जो काही निधी वाढीव टप्प्यासाठी लागतो तरतूद करण्यास सांगावे यावर त्यांनी शिष्टमंडळाला प्रतिप्रश्न केला की हा निर्णय झालेला आहे व याला तरतूद कशी काय झाली नाही? याबद्दल मी दादा भुसे यांना बोलतो त्यांनी आपसूकपणे आपल्या शिक्षक बांधवातून निवेदन स्वीकारून यावर कार्यवाही करण्यास सांगतो. असे आश्वासन शिंदे साहेब यांनी शिष्टमंडळाला दिले.
आज दिवसभर जालना येथे एकनाथ शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी तीन टिमा मध्ये शिक्षक समन्वय संघाच्या विभागणी केली होती
त्यामध्ये अर्जुन खोतकर साहेब यांच्या निवासस्थानी एक टीम
दुसरी टीम मा. आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या निवासस्थानी एक टीम
तर तिसरी टीम आझाद मैदानात होती अतिशय मोठ्या संख्येने संभाजीनगर जालना परभणी बीड व बुलढाना जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
*परंतु शिक्षक बांधवांना शिक्षक समन्वय संघ शिक्षकाच्या खात्यात प्रत्यक्ष वाढीव टप्प्याचा पगार होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही पुढील आठवड्यात 27 व 28 जानेवारीला प्रत्यक्ष मंत्रालयात जाऊन समन्वय संघाची टीम ही मा. मंत्री महोदय व इतर प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.*