* भेंडा प्रतिनिधी :
श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मा.विश्वस्त मा.काशिनाथ नवले, शिक्षण संस्थेचे सहसचिव रवींद्र मोटे, गणेश गव्हाणे, अप्पासाहेब खरड, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कृष्णा आरगडे, दिपक चक्रनारायण, बोधक आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे प्रा.डॉ.राजेंद्र गवळी व उपप्राचार्य दिपक राऊत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
श्री काशिनाथ नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,ध्वजगीत, महाराष्ट्र गीताचे ताला सुरात समूहगायन केले.
शाळेच्या रेड, यलो, ग्रीन, ब्लू हाऊसच्या व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कवायत संचालनाने उपस्थितांची मने जिंकली. शाळेचा हेड बॉय कु. आदर्श भागवत, हेड गर्ल कु. विश्वंभर अंजली यांनी पाहुण्यांचे संचलन केले. तसेच अनेक विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तालुकास्तरीय विविध स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये
कु. माळी तेजस्विनी संपत माळी हिने गोल्ड मेडल, कु. काजळे कार्तिकी शिवाजी सिल्वर मेडल, कु. काळे श्रद्धा सचिन ब्रांच मेडल, कु . मुनोत हर्षदा संदेश हिने व जिल्हास्तरीय स्कॉलरशिप परीक्षा मध्ये कु. मुगसे नंदिनी नितीन नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
सन 2024 मध्ये शालेय अंतर्गत हस्ताक्षर स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये प्रथम एडके देवराज कानिफनाथ, कु. नवले सिद्धी राजेंद्र द्वितीय ,मोठ्या गटामध्ये प्रथम कु.पठाण सारा समिर कु. मुंगसे नंदिनी नितीन, द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास परिसरातील पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेतले. रेड, येलो, ग्रीन, व ब्लू हाऊसच्या व स्काऊट गाईड कवायत व संचलनाचे नियोजन क्रिडाशिक्षक गणेश गव्हाणे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सविता गायकवाड, तसेच विद्यार्थिनी तनिष्का गायकवाड व रितिका म्हस्के यांनी केले. तर आभार प्रदर्शन रत्नमाला खराडे यांनी केले.