दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
*महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवताना आपल्या आरोग्याकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे आपण आरोग्य संपन्न राहिले तरच आपले कुटुंब उत्तम राहील कुटुंबातील मुली व आपल्या सुना यांना मैत्रिणीप्रमाणे समजून घ्या तुमच्या चांगल्या वागण्यामुळेच आजची कुटुंब व्यवस्था टिकून आहे असे प्रतिपादन सौ तेजस्विनी क्षितिज घुले यांनी केले*
*भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत ने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान या निमित्ताने तेजस्विनी घुले बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अंजली देवी हिम्मतसिंह देशमुख या होत्या .
प्रमुखातिथी म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अंजलीताई गाडगे सरपंच सौ.रोहिणीताई निकम उपसरपंच सौ.संगीताताई शिंदे ,सौ.माधुरीताई गव्हाणे ,सौ.स्मिताताई काळे ,सौ.पद्माताई फुलारी,सौ. सुजाता गव्हाणे,सौ. निता काळे माजी उपसरपंच सौ सीमाताई फुलारी,सौ. अस्मिता गव्हाणेआदी उपस्थित होते*
*प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित सर्व महिलांचे माजी सरपंच संगीता गव्हाणे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले प्रमुख पाहुण्यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख व्याख्याते श्री रोग तज्ञ अंजलीताई गाडगे यांनी स्त्रियांचे आजार त्यानंतर घ्यावयाची काळजी किशोरवयीन मुलींसाठी यावयाची दक्षता या विषयावर सर्व महिला यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यमान सरपंच रोहिणीताई निकम माजी सरपंच उषाताई मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले हळदी कुंकू कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांच्या आणि महिलांच्या स्वागतासाठी खूप सुंदर रांगोळीचे रेखाटन केल्याबद्दल ज्ञानेश्वरी कादे यांचा सन्मान श्री रोग तज्ञ अंजलीताई गाडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी श्रेयाताई देशमुख सुलभा साबळे स्वातीताई वायकर अनिता गायकवाड उज्वला गव्हाणे सुवर्ण गव्हाणे मनीषा फुलारी अर्चना पंडित शिल्पा गव्हाणे नीताताई वांढेकर वंदना वाबळे प्रगती उगले पुनम शिनगारे सुनीता गुंजाळ विद्या लोळगे रोहिणी गव्हाणे सुनिता क्षीरसागर मीनाक्षी गव्हाणे अलका शिंदेआदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमल ताई गवळी मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन उपसरपंच संगीता शिंदे यांनी केले*