-
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी: नेवासा पोलीस ठाण्यात आज शनिवारी दि.18रोजी पोलीस ठाणे नेवासा येथे संबंधित नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात येणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले .
-
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या *तक्रार निवारण दिनाचे* आयोजन पोलीस ठाणे स्तरावर आजपासून प्रत्येक शनिवारी करण्यात आलेले आहे.
सदरचा तक्रार निवारण दिन हा मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या तक्रारीवर विहित मुदतीत, उचित कार्यवाही, कारवाई झाली नसल्यास आपण तक्रार निवारण दिन मध्ये मांडू शकता.
आजचा तक्रार निवारण दिन पोलीस ठाणे नेवासा येथे 11 ते 2 वाजेपर्यंत पार पडणार आहे.
तक्रार निवारण दिनासाठी येताना सोबत आपला तक्रार अर्ज किंवा फिर्यादीची (एफ.आय.आर.) प्रत घेऊन यायची आहे.
*धनंजय अ. जाधव.*
पोलीस निरीक्षक,
पो. ठाणे नेवासा.
9011581111
9422581111
9923581111
9960581111