26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

कुकाणा येथील धान्य चोरांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले*

 


*धान्यचोर जेरबंद*

*धान्यचोर पोलीसांच्या जाळ्यात*

*नेवासा पोलीसांनी दमदार कामगिरी *दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :या बाबत सविस्तर वृत्त असे की
कुकाणा येथील व्यापारी
सतिष हरकचंद भंडारी वय 56 वर्षे धंदा व्यापार रा- शेवगांव रोड कुकाणा ता. नेवासा यांनी नेवासा पो.स्टे.ला ता. 16/1/2025 रोजी सकाळी फिर्याद दिली की, ता. 16/1/2025 रोजी नेहमी प्रमाणे पहाटे 4.00 वा. चे सुमारास मी उठलो व कॉम्पलेक्स समोर असलेले धान्य पाहणेसाठी गेलो असता माझे दुकाना जवळुन दोन मोटारसायकलवर चार इसम धान्य घेवुन पळुन जाताना दिसले खात्री करता 1) 20,000-00 रु. कि.चे तुरीचे धान्य अंदाजे 300 किलो चोरुन नेले आहे वगैरे माळाचे फिर्यादीवरुन नेवासा पो.स्टे. 1 गुरन. 41/2025 भा.न्या.सं.क.303(2) प्रमाणे ता. 16/1/2025 रोजी 08.52 वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे तपासात कुकाणा गावातील 1) आजीनाथ राजु तांबे रा. कुकाणा ता. नेवासा ह.रा.तरवडी ता. नेवासा 2) विजय दत्तात्रय घोडके रा-दहिगांव रोड कुकाणा ता. नेवासा 3) शाहरुख दगडु पठाण रा. झोपडपटटी कुकाणा ता. नेवासा 4) भैय्या उर्फ नदीम निजाम अत्तार रा. कुकाणा ता. नेवासा अशांनी केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या गुन्ह्यातील यांची नावे खात्रीशीर बातमीदाराकडुन मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेत असत पेट्रोलिंग दरम्याण आरोपी आणि पोलीसांची समोरा समोर नजरा नजर झाली असता, आरोपी पळून जावु लागले त्यानंतर पोलीस स्टेशन नेवासा कडील पोकों/हरी घायतडक व पोकों/संतोष खंडागळे यांनी आरोपीचा गल्ली बोळातून पाठलाग करुन शिताफीने पकडले.

त्यानंतर 1) आजीनाथ राजु तांबे रा. कुकाणा ता. नेवासा ह.रा. तरवडी ता. नेवासा 2) विजय दत्तात्रय घोडके रा-दहिगांव रोड कुकाणा ता. नेवासा 3) शाहरुख दगडु पठाण रा. झोपडपटटी कुकाणा ता. नेवासा अशांना पकडुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिलेली असुन नमुद आरोपीतांकडून सदर गुन्हयात चोरलेल्या मालापैकी

1) 6,600/- रु. किंमतीचे 100 किलो तुर धान्य दोन गोण्यामध्ये गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या

2) 20,000/- रु. कि.ची एक बजाज प्लॅटीना कंपनीची मो.सा.बिगर नंबरची

3) 25,000/- रु. हिरो स्पेलंडर कंपनीची मो.सा.बिगर नंबरची

51,600/- रु.

वरील प्रमाणे चोरीस गेले मालापैकी तुर धान्य व चोरीचा गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या असुन सदर गुन्हयातील वर नमुद तीन आरोपीतांना गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच ता. 16/1/2025 रोजी 10.59 वा. अटक करण्यात आलेली असुन त्यांची मा. न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.

धान्य चोरीचे अशा प्रकारचे गुन्हे यापुर्वी देखील घडलेले असुन नेवासा पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत, या गुन्ह्यात देखील या आरोपींचा काही सहभाग आहे किंवा कसे याबाबतचा सखोल तपास देखील करण्यात येणार आहे.


सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरमपुर, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.धनंजय जाधव पो.स.ई. शैलेंद्र ससाणे, पोना.बी.बी. काळोखे, पोकॉ. हरी घायतडक, चापोकॉ. संतोष खंडागळे, पोकों. संदिप ढाकणे, पोकॉ. ज्ञानेश्वर रसाळ यांनी केलेली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या