* नेवासा प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील स्व.भाऊसाहेब देशमुख वाचनालयामार्फत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा व्यापक उपक्रम कुकाणा2025, माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात वाचनालयाचे अध्यक्ष अड.देसाई देशमुख व सचिव आशा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्राचार्य बबनराव वाबळे होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करतांना बबनराव वाबळे यांनी वाचन संस्कृती टिकली तरच सक्षम नागरिक तयार होऊन स्पर्धा परीक्षेत युवकांना यशाची दारे उघडतील.विद्यार्थ्यानी मोबाईल चा मर्यादित वापर करून वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा परंतु पुस्तके वाचल्याने ज्ञानाच्या भंडारात वाढ होते,आपले ध्येय विद्यार्थी वाचनाने सहज साध्य करू शकतात, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संभाजी देशमुख,मा.सरपंच कारभारी गोर्डे, ग्रंथालयाचे ग्रंथपाल अनिल सरोदे,पत्रकार प्रा.ईस्माइल शेख, अक्षय भूसारी,बाळासाहेब साबळे,सतिष वाबळे,प्रा.संतोष तागड,माऊली खाटीक,अंबादास कचरेआदि ,उपस्थित होते.यावेळी या उपक्रमात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणात वाटप वाचनालयामार्फत करण्यात आले.
यावेळी स्रूती वासेकर, नैतिक सातपुते, अध्यापक अमोल बरबडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कूलदिप देशमुख,सूत्र संचालन प्रा.संतोष निसरड तर आभार प्रा.देविदास आंग्रख यांनी मानले.