दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी
नागेबाबा उद्योग समूह संचलित कृष्णाई शिक्षण संस्थेचे हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगाव येथे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .
या प्रसंगी तेलकुडगाव येथील विद्यापीठ स्तरावर कबड्डी मध्ये यश मिळवणाऱ्या कु. शुभांगी घाडगे व श्रद्धा काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री रावण गारुडे तसेच श्री पिलाजी वाघुले उपस्थित होते .
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळाकडे लक्ष द्यावे .खेळाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण असल्याबाबत कुमारी शुभांगी घाडगे हिने विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून सांगितले .
विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री गोरक्षनाथ नवले यांनी स्पर्धांचे नियोजन केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री संदीप फुलारी,
शिक्षक श्री भानुदास वाघ श्री उमेश मुंडे श्री मारुती धाडगे सह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भोसले मॅडम यांनी केले व समारोप श्री देवेंद्र वाघुले यांनी केला.