17.9 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

spot_img

बेकायदेशीर नायलॉन मांजा विकणाऱ्यावर नेवासा पोलीसांची कारवाई”

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी : नेवासा येथे बेकायदेशीर पद्धतीने मांजाची विक्री करणार्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली. या बाबत सविस्तर वृत्त असे की
दि. १४/०१/२०२५
पोकों / ५९७ अमोल रामनाथ साळवे नेमणुक नेवासा पोलीस स्टेशन ता नेवासा जि अहिल्यानगर मो नं ९८३४९४७९८४
समक्ष नेवासा पोलीस स्टेशनला येथे हजर राहून सरकारतर्फे फिर्यादी दिली असून, मी नेवासा पोलीस स्टेशन येथे मागील ४ वर्षापासुन पोलीस कॉस्टेबल या पदावर नेमणुकीस असुन दिनांक ०१/०१/२०२५ पासुन नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे शोध पथक मध्ये सध्या कामकाज करत आहे.
आज दिनांक १४/०९/२०२५ रोजी सकाळी ११/०५ वा चे पोलीस नाईक गांगुर्ड, पोको नारायण डमाळे, पोकों आप्पा तांबे, पोकों अवि वैदय व मी असे पोलीस स्टेशनला हजर असताना मा पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन यांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलावून कळविले की, आत्ताच गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे नेवासा खुर्द येथील गंगानगर परिसरामध्ये उषा टॉकीज चौकामध्ये एक इसम हा नाईलॉन माजा विक्री करत आहे आत्ता गेलास मिळून येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे त्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकुन योग्य ती कायदेशीर कारवाई करा असा मुफजल आदेश दिल्याने लागलीच पोना गांगुर्डे यांनी दोन लायक पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावून घेवून त्यांना बातमीचा आशय समजावुन सांगुन छापा घालणे कामी हजर राहुन पंचनामा लिहून देणेस कळविले त्यास पंचानी होकार दर्शविला वरुन आम्ही व पंच असे खाजगी वाहनाने नमुद ठिकाणी ११/३० वा खात्री करन छापा टाकला असता एक इसम गंगानगर परिसरात मध्ये उषा टॉकीज चे समोरील डाबरी रोडच्या बाजुला मांजा विक्री करत असताना दिसला सदर इसमास जागीच पकडुन त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव विजय बाळासाहेब बर्डे वय २२ वर्षे रा. गंगानगर नेवासा खुर्द ता नेवासा जि अहिल्यानगर असे सांगितले.

त्यास आम्हा पोलीसांची व पंचाची ओळख करुन देवून झडतीचा उददेश समजावून सांगून आम्हा पोलीसांची व पंचाची अंगझडती देवुन सदर इसमाकडील कापडी पिशवीची झडती घेतली असता खालीलप्रमाणे नायलॉन मांजा मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे
१) ५०० /- रु किं चे महेंदी रंगाचा नायलॉन नायलॉन मांजा गुंडाळलेली ०१ प्लॉस्टीक रिळ त्यावर इंग्रजीमध्ये MONO KITE FIGHTER असे लिहिलेले जु.वा. किं.अं
२) ३०० /- रु किं चे काळपट रंगाचा नायलॉन मांजा गुंडाळलेली ०१ लाकडी रिळ जु.वा. किं.अं
एकुण ८०० /- रु एकुण
येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उददेशाने मिळून आल्याने तो पोना गांगुर्डे यांनी दोन पंचासमक्ष जप्त करुन व आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आलो आहे.
तरी आज दिनांक १४/०१/२०२५ रोजी ११/३० वा चे सुमारास मौजे नेवासा खुर्द येथील गंगानगर परिसरामध्ये उषा टॉकीज चौकातील डांबरी रस्ताच्या बाजुला इसम नामे विजय बाळासाहेब बर्डे वय २२ वर्षे रा. गंगानगर नेवासा खुर्द ता नेवासा जि अहिल्यानगर हा प्लास्टीक किंवा पक्या धांग्या पासुन बनविलेल्या नायलॉन मांज्याचे विक्री मुळे पश्यांना, प्राण्यांना व मानवी जिवितास तीव्र इजा होवुन अपघात घडणे किंवा जिवित हानी होवु शकते हे माहिती असताना देखील त्यांने महाराष्ट्र शासन निर्णय CRT – २०१५/CR ३७ TC२ दिनांक १८/६/२०१६ अन्वये काढलेल्या निर्देशाचे अवज्ञा करुन इतरांचे जिविताची सुरक्षा धोक्यात आणण्याची कृती करुन नायलॉन मांज्यांचे विक्री करण्यांचे उददेशांने स्वतः कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे. म्हणुन माझी त्यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३,१२५ सह पर्यावरण सरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५,१५ प्रमाणे फिर्याद आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अवि वैद्य, नारायण डमाळे, अमोल साळवे व भारत बोडके यांनी सिताफिने केले.

नायलॉन मांजामुळे मागील चार दिवसात राज्यात गंभीर जखमी होण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पारधे हे देखील काल मांज्यामुळे गंभीर जखमी झालेले आहेत.

बेकायदेशीर मांजाचा साठा कोणी केला असेल, विकत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या