दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी:
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्यासह विविध कार्यक्रम सादर केले. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. डॉ.नरेंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात संस्थेचे विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, अॅड देसाई( आबा) देशमुख,संचालक काशिनाथ नवले, अशोक मिसाळ, शिवाजी कोलते, सहसचिव रवींद्र मोटे , शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे, अशोकराव वायकर ,पत्रकार कारभारी गरड, सोमनाथ कचरे ,पत्रकार नामदेव शिंदे, सरपंच वैभव नवले, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कृष्णा आरगडे, सहसचिव प्रवीण घुले, प्रा.सोपानराव मते, गणेश सिनारे, गणेश आरगडे, विजय चौधरी, आदी या प्रसंगी उपस्थित होते
.
प्रारंभी उपप्राचार्य दिपक राऊत यांनी पब्लिक स्कुलचा वार्षिक अहवाल मांडला. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शन भरवले होते. विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधनासह, पर्यावरण, जागृकता, देशभक्तीपर गीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. वर्षभरात क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला
. या कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ . राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दीपक राऊत, राणी स्वामी, योगिता शेजूळ, उषा साठे, रेखा तरटे, जयश्री थोरे, सुरेखा राऊत, उज्वला फटांगरे, रुख्मिणी वेताळ, सुदिप खरात, प्रविण कोकरे, सचिन गावडे, गणेश गव्हाणे, बापूसाहेब टेकणे, सुनिल शिंदे, अनिल शेळके, कलावती घोंगाणे, अढागळे बाबा यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व आजी- माजी विद्यार्थी उपस्थित होते .कु.सारा पठाण, कु. समीक्षा कदम व सृष्टी आरगडे यांनी सूत्रसंचालन केले तर शीला गिरीकुमार यांनी आभार मानले.