*नागवडे कुटुंब दिलेला शब्द पाळणारे कुटुंब
दै.नगरशाही दहिगाव साकत प्रतिनिधी /शिवा म्हस्के
नगर श्रीगोंदा विधानसभा निवडणूक चुरशी होणा हे एकंदरीत स्पष्ट झाले आहे. प्रमुख लढत भाजपचे विक्रम पाचपुते, महाविकास महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांचा नगर नगर तालुक्यातील दौरा झाला आहे. उर्वरित उमेदवार प्रचार सभा दौरा अजून झालेला नाही.नगर तालुक्यातील गट गणातील प्रचार दौरात नागवडे यांना मिळता प्रतिसाद विरोधाकांन घाम फोडणारा आहे. आज नियोजित दौरा अंबिलवाडी, रुईछत्तीसी, वाटेफळ, साकत, दहिगाव शिराढोण, वाळुंज असा प्रचार दौरा होता.
आज सायंकाळी दहिगाव मध्ये स्वयम उत्स्फूर्त दहिगाव ग्रांमस्थ मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते. त्यांची कारणे देखील ग्रामस्थ आज प्रचार सभेवेळी खाली बसुन सांगत होते. या आधी दहिगाव मधुन बबनराव पाचपुते यांना आमदरकी भरघोस मतांनी विजयी केले आहे. तसेच मधील काळात राहुल जगताप यांनी देखील एक संधी आमदरकी दिली होती. पण या उमेदवारी आमदरकी भरघोस मतदान करून देखील दहिगाव विकास कामा गाठी भेटी करण्यास काट कसर केली नगर तालुक्यातील साकळाई योजना प्रश्न निकाली काढता आला नाही भाजप पक्षाचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री राहुन देखील वाळकी सभेत दिलेला शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला नाही. त्यांमुळे नगर श्रीगोंदा मतदारसंघातील ३५ गाव भाजप पक्ष उमेदवारावर नाराज आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अनुराधा नागवडे यांनी आपल्या प्रचार सभेत नागवडे कुटुंब दिलेला शब्द पाळताच गेल्या ५० वर्षांत शेतकर्यांना साखर कारखान्याचे ऊसाचे पैसे वेळेवर दिले जातात. नागवडे कुटुंबाच्या जेवढ्या संस्था कारखानेचे कामगारांचा आज पर्यंत एक रुपया थकीत नाही. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आता विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा असे आव्हान देखील अनुराधा नागवडे यांनी उपस्थित केले.दहिगाव ग्रामस्थ एक मुखाने अनुराधा नागवडे मोठ्या मताधिक्याने विजयी करू असे आश्वासन दहिगावकर ग्रामस्थांनी दिले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते संपत म्हस्के, बाबासाहेब ,गुंजाळ, राजेंद्र भगत, प्रविण गोरे, प्रविण कोकाटे, अनशाबापु म्हस्के,मा ग्रा. सदस्य बाळासाहेब हंबडेॅ,रेहनबान सय्यद, संपत वाघमोडे, सुनंदा पाचपुते, भानुदास देवतेस, राजेंद्र गुंड, बाळासाहेब वाघ, एकनाथ म्हस्के, अंकुश म्हस्के, संजय पोटरे, सदाम शेख, विश्वनाथ शिंदे, माजी सरपंच नामदेव म्हस्के, अंबादास हिंगे, तुकाराम आन्हाड, नाना गायकवाड,मा.उपसरपंच महेश म्हस्के, चेरमन भानुदास ढेरे,रफीक शेख, तुकाराम वाघ, गुलाब फुलमाळी, पापाभाई शेख,लक्ष्मण बनकर, पांडुरंग पोटरे, शिवाजी सांळुके,एकनाथ हिंगे, सुनील म्हस्के सर,कृष्णा म्हस्के,सुधाकर मिसाळ, रज्जक शेख, अकबर सय्यद, सुमन पोटरे, माजी सरपंच लहानुबाई जावळे, ठकुबाई जावळे, निलफोर सय्यद, हरणाबाई हंबडेॅ, ग्रा. सय्यद ईदुंबाई सांळुके, संगीत चव्हाण, दहिगाव ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट….*
शिवसेना जिल्हा उपप्रमुख व नगर महाविकास आघाडीचे नेते शशिकांत गाडे यांनी दहिगाव येथील प्रचार सभेत आपल्या भाषणात आघाडीचे अनेक पदाधिकारी विशेष माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आघाडीचे धर्म पाळावा पंधरा वर्षे आघाडीने हराळ यांना वाळकी गटात मदत केली आहे.त्यामुळे नागवडे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये महाविकास आघाडी हराळ यांच्या विरोध्दात काम करण्याचा ईशारा गाडे यांनी दिला आहे. आता हराळ आघाडी धर्म पाळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.